नाशिकला मंदिराबाहेरूनच विठ्ठलाचे दर्शन

आषाढी वारीला पंढरपूरप्रमाणे महाराष्ट्रातील प्रत्येक विठ्ठल मंदिरात मोठा सोहळा असतो. मात्र, यंदा कोरोना वैश्विक महामारीचे सावट गावोगावच्या विठ्ठल मंदिरांवरही बघण्यास मिळाले. कॉलेज रोडवरील नामदेव विठ्ठल मंदिरात आज भाविकांना प्रवेश नसला तरी मंदिर व्यवस्थापनाने सकाळी महापूजा, आरती, हरिपाठ, विष्णूसहस्त्र नाम आदी करण्यात आले. मंदिरात प्रवेश नसल्याने भाविक मंदिराबाहेरूनच दर्शन घेत असल्याचेही शहरातील मंदिरांमध्ये दिसून आले.

First Published on: July 1, 2020 5:32 PM
Exit mobile version