हलगर्जीपणामुळे चिमुरडीचा जीव धोक्यात; मुंबईच्या वाडिया हॉस्पिटलचा प्रताप!

डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे एका दीड महिन्याच्या चिमुरडीची शारिरीक हेळसांड आणि तिच्या जिवाशीच खेळ करण्याचा प्रकार मुंबईतल्या प्रसिद्ध अशा वाडिया हॉस्पिटलमध्ये घडलाय. गर्भवती असताना या मुलीच्या आईला तिथल्या डॉक्टरांनी चुकीचा सल्ला दिला आणि तिच्या आयुष्याचा खेळ होऊन बसला. त्याचाच परिणाम म्हणून गेल्या ४२ दिवसांपासून या मुलीची प्रत्यक्ष मृत्यूशीच झुंज सुरू आहे. कहर म्हणजे मुलीच्या वडिलांना तिला भेटूच दिलं जात नाहीये. या पार्श्वभूमीवर पोलिसांत धाव घेतलेल्या वडिलांना रुग्णालयाने तक्रार मागे घेण्यासाठी एका राजकीय पक्षामार्फत १० लाखांची ऑफर देखील दिली. या व्हिडिओमध्ये मुलीच्या वडिलांनी सांगितलेली कहाणी धक्कादायक आणि संतापजनक आहे!

हॉस्पिटल प्रशासनाकडून मात्र आरोप फेटाळण्यात आले आहेत. हॉस्पिटलच्या प्रवक्त्या फोरम स्वार यांनी याप्रकरणी चौैकशी सुरू असल्याचं ‘माय महानगर’शी बोलताना सांगितलं. शिवाय, पांचाळ कुटुंबाकडून केले गेलेले सर्व आरोप चुकीचे आहेत. चौैकशी पूर्ण होईपर्यंत काहीच बोलता येणार नाही, असंही सांगितलं आहे.

First Published on: May 14, 2019 2:05 PM
Exit mobile version