अनेक सखल भाग जलमय, रस्ते पाण्याखाली

कल्याण-डोंबिवली आणि आजूबाजूच्या परिसरात सकाळपासून मुसळधार पाऊस सुरु आहे. कल्याण डोंबिवलीच्या काही भागात पाणी साचले आहे. तर कल्याण पश्चिमेतील शिवाजी चौक, सहजानंद चौक, कल्याण पूर्वेतील खडेगोळवली परिसारत पाणी साचले आहे. मात्र, कल्याण पूर्वेतील विजय पाटील नगर, ओस्टीन नगरमध्ये पूर सदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. या परिसरात मोठा नाला नसल्याने संपूर्ण परिसर जलमय झाला आहे.

First Published on: July 19, 2021 1:49 PM
Exit mobile version