गणेश पाटोळे याचे कोरोनावर आधारित रॅप साँग

कोरोनाच्या संकटामुळे सर्व नागरिक आपापल्या घरामध्ये लॉकडाऊन आहेत. मात्र अशा परिस्थितीतही ते आपापल्या छंद, गुणांना वाव देत आहेत. सोशल मीडियावर विविध चॅलेंजचे ट्रेंड सुरू असतानाच गोरेगावमधील संकल्प कॉलनीत राहणाऱ्या गणेश अशोक पाटोळे याने चक्क रॅप सिंगर बनण्याचे चॅलेंज स्विकारले. त्याचे काका संजय पाटोळे यांनी हे चॅलेंज त्यांच्या सर्व भावंडांना दिले असून सद्यपरिस्थितीला अनुसरून एका कवितेची निर्मिती करण्याचे चॅलेंज दिले. गणेशने न केवळ कविता केली, तर त्याचे रॅप म्युजिकमध्ये रुपांतर करून ते घरच्या घरीच शूट करून सोशल मीडियावर अपलोडदेखील केले. हॉटेल मॅनेजमेंट केलेल्या गणेशने लॉकडाऊनमध्ये कवी, रॅप सिंगर, साँग एडिटर सगळचं बनला आहे. यात त्याला त्याची बहिण सुप्रिया (कॅमेरा पर्सन) हिचीदेखील मदत झाली आहे.

First Published on: June 4, 2020 9:00 AM
Exit mobile version