नाशिक-पुणे हायवेवरील टोल नाक्यावरील कामगारांचे आंदोलन

नाशिक-पुणे महामार्गावरील शिंदे येथील टोल नाक्यावरील कामगारांनी पूर्ण वेतन न मिळाल्याने मंगळवारी संध्याकाळी आंदोलन केले. कोरोना संदर्भात कोणत्याही प्रकारची सुविधा मिळत नसल्यानेही कामगारांमध्ये संताप दिसून येत आहे. मंगळवारी संध्याकाळपासून कामगारांनी कामबंद आंदोलन केल्याने या मार्गावरील शेकडो वाहने विना टोलची धावत आहे. यात सिक्युरिटी गार्ड, जनरल लेन असिस्टंट, सुपरवायझर आणि टोल केबिनमध्ये काम करणाऱ्या महिला कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. या सर्व कर्मचाऱ्यांनी व्यवस्थापनाच्या विरुद्ध आंदोलन केले असून वेळेवर वेतन मिळत नसल्याने महिला कर्मचारी अधिक संतप्त झाल्याचे चित्र होते.

First Published on: June 10, 2020 8:21 AM
Exit mobile version