दिव्यांग नागरीक ‘अरुण आंग्रे’ यांची प्रेरणादायक कथा

आपल्या दोन्ही पायांनी अधू असून, पदवी पर्यंतचे शिक्षण घेत गावातच व्यवसाय उभ्या करणाऱ्या अरुण शंकर आंग्रे यांनी एक वेगळा आदर्श दिव्यांग तरुणांपुढे उभा केला आहे. महाड तालुक्यातील रेवतळे येथील अरुण आंग्रे यांनी गावातच दुकान आणि पीठ गिरण सुरु केली आहे. याशिवाय ते पहाटे पाच वाजता महाडला येऊन भाजी विक्री करतात. या कष्टातूनच त्यांनी घर सांभाळत मुलांचे शिक्षणदेखील सुरु ठेवले आहे. एखाद्याला अपंगत्व आले की, तो व्यक्ती खचून जातो. मात्र, अरुण आंग्रे दिव्यांगावर मात करत खंबीरपणे व्यवसाय करत आहेत.

First Published on: December 3, 2021 2:55 PM
Exit mobile version