नाशिकच्या पंचवटीतील काळाराम मंदिरात पूजा

अयोद्धेतील राम मंदिराच्या भूमिपूजन सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर पंचवटीतील रामकुंड येथील काळाराम मंदिराला एसआरपीचा गराडा घातलेला पाहायला मिळत आहे. या ठिकाणी एक मंदिर उघडले असून दुसरे मंदिर मात्र बंद ठेवण्यात आले आहे. मंदिराभोवती पोलिसांचा कडक बंदोबस्त पाहायला मिळत आहे. पंचवटीतील काळाराम मंदिराकडे येणारे सर्व रस्ते बॅरिकेटींग करून बंद  करण्यात आले आहेत. नित्यपाद्यपुजा आणि पारी १२ वाजून ४० मिनिटांनी महाआरती होणार आहे. मंदिराचे विश्वस्त समितीचे अध्यक्ष तथा जिल्हा न्यायाधीश यांची उपस्थिती पाहायला मिळत आहे.

First Published on: August 5, 2020 11:40 AM
Exit mobile version