फुटिरतावादी नेता यासिन मलिकला जन्मठेपेची शिक्षा

काश्मिरी फुटीरतावादी नेता यासिन मलिकला दहशतवादी फंडिंग प्रकरणात एनआयएच्या विशेष न्यायालयाने जन्पठेपेची शिक्षा सुनावली आहे. विशेष एनआयए न्यायालयात बुधवारी याप्रकरणी सुनावणी झाली. गुन्हेगारी कट, देशाविरुद्ध युद्ध पुकारणे आणि काश्मीरची शांतता बिघडवणे यासह बेकायदेशीर कृत्यांमध्ये सहभागी होण्याच्या कलमांखाली यासीन मलिकवर आरोप निश्चित करण्यात आले आहेत. यासीन मलिकनेही हे आरोप कोर्टासमोर मान्य केले होते. न्यायालयाने १९ मे रोजी यसिन मलिकला दोषी ठरवले होते.

First Published on: May 25, 2022 10:06 PM
Exit mobile version