काँग्रेसच्या ‘त्या’ आमदारांच्या भाजप प्रवेशाला पक्षश्रेष्ठींचा हिरवा कंदील नाहीच!

काँग्रेसच्या ‘त्या’ आमदारांच्या भाजप प्रवेशाला पक्षश्रेष्ठींचा हिरवा कंदील नाहीच!

कोल्हापूर विधानसभा पोटनिवडणूक : भाजप आणि कॉंग्रेसचे उमेदवार ठरले

काँग्रेसचे ६ आमदार सोमवारी भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचं बोललं जात होतं. मात्र, भाजपच्या दिल्लीतील पक्षश्रेष्ठींकडून त्यांच्या प्रवेशासाठी अद्याप हिरवा कंदील न मिळाल्यामुळे आज फक्त वंचित बहुजन आघाडीला दोन दिवसांपूर्वी रामराम ठोकणारे गोपीचंद पडळकर यांचाच भाजप प्रवेश होणार असल्याचं बोललं जात आहे. मालाड पश्चिमचे अस्लम शेख, चिखलीचे राहुल बोंद्रे, शिरपूरचे काशीराम पावरा, साक्रीचे डी. एस. अहिरे, अक्कलकोटचे सिद्धराम म्हेत्रे आणि पंढरपूरचे भारत भालके अशी त्या सहा आमदारांची नावं आहेत. आज दुपारी १२ वाजता मुंबईच्या गरवारे क्लबला होणाऱ्या जाहीर कार्यक्रमात त्यांचा भाजप प्रवेश होणार असल्याचं सांगितलं जात होतं.

गोपीचंद पडळकरांचा प्रवेश होणार?

दरम्यान, काँग्रेस आमदार राहुल बोंद्रे यांनी यासंदर्भातील वृत्त फेटाळून लावले होते. ‘निवडणुकीच्या काळात अशा अफवांना पेव फुटत असते. मी सध्यातरी माझ्याच मतदारसंघात आहे’, अशी प्रतिक्रिया त्यांनी ‘आपलं महानगर’शी बोलताना दिली होती. त्यामुळे या आमदारांच्या प्रवेशावरून अनेक तर्क लढवले जात होते. दरम्यान, या ६ आमदारांचा जरी भाजप प्रवेश लांबणीवर पडला असला, तरी वंचितमधून येणारे गोपीचंद पडळकर यांचा प्रवेश निश्चित असल्याचं मानलं जात आहे.

First Published on: September 30, 2019 10:50 AM
Exit mobile version