हार आणि जीत

हार आणि जीत

बाप्पाशेठचा सोपारा मतदारसंघात इतक्या वर्षात राजकीय दबदबा होता.सोपाराबाहेरचे लोक त्याला दहशत म्हणत आणि सोपार्‍यातील लोकांचे त्याबद्दल काहीच मत नव्हते.कितीही समज गैरसमज असले तरी बाप्पाशेठचा एकहाती अंमल या विभागात होता.त्यामुळे म्हणावा तेव्हा विरोध बाप्पाशेठला नव्हता.परंतु, आता मात्र यावेळी हिंद सेनेने बाप्पाशेठच्या वर्मावर घाव घालत एनकाऊंटर स्पेशालिस्ट वर्मांना बाप्पाशेठविरोधात फिल्डींग लावली होती.त्यामुळे सोपार्‍याच्या यावर्षीच्या निवडणुकीला एक वेगळे स्वरूप आले होते.त्यामुळे हिंदसेनेच्या पक्षप्रमुख सायबांनी सोपार्‍याकडे विशेष लक्ष द्यायचं ठरवलं होतं.यावेळी फक्त त्यांनी वर्मांच्या हातात त्यांनी रायफल ऐवजी फक्त बाण सोपवला होता.वर्मांनी सुरूवातीपासूनच जोरात सुरूवात केली होती.

अनेक दिवस जोरात प्रचारफेर्‍या काढल्या होत्या.निव़डणुकीचं रान पेटल्यापासून अनेक गुन्हे आणि गुन्हेगार होलसेलमध्ये बाहेर येत होते आणि आत जात होते.एकप्रकारे बाप्पाशेठच्या साम्राज्याला हादरवण्याचा हर एक प्रयत्न हिंदसेनेकडून होत होता.आज स्वत: हिंद सेनेचे पक्षप्रमुख सोपार्‍याच्या रणांगणात आले होते.यावेळी , पक्षप्रमुख सायबांच्या स्वागताची जय्यत तयारी करण्यात आली होती.नेहमीप्रमाणे हार तुर्‍यांची कमतरता नव्हती.मोठाला हार आणण्यात आला होता.कार्यकर्त्यांनी एक मोठ्ठाला हार सायबांसाठी आणला होता.हार मोठा असला तरी जीत मात्र मोठी पक्षप्रमुखांना अपेक्षित होती.त्यामुळे आणा,रे तो हार म्हटला.कार्यकर्त्यांनी देखील मोठ्या उत्साहात हार आणला.व्यासपीठ मोठे आणि तेवढाच मोठा हार वाटत होता.हार आणण्यात आला आणि हार तुटलाच.सर्वांच्या काळजात धस्स झाले.

हाराचाच एनकाऊंटर झाला होता.वर्मांनी कार्यकर्त्यांनी फैलावर घेतले होते.हा हार कुठून आणला,वर्मांनी कार्यकर्त्यांना प्रश्न विचारला.साहेब ते हारवाल्याशी बार्गेनिंग करून आणलाय,कार्यकर्ता म्हणाला.अरे,पण बार्गेनिंग कशाला?वर्मा वैतागतच बोलले.साहेब ते आपण 10 रूपयांत थाळी देतोय,आणि तो हाराचे 100 रूपये म्हणाला.मग मी केली बार्गेनिंग,मग त्याने हा हार दिला,कार्यकर्ता प्रामाणिकपणे म्हणाला.वर्मांना कळून चुकले होते.तरी देखील हार तुटला तरी कुठलाही अपशकुन न समजता सोपार्‍यातील जनता थाळीच्या जीवावर आपल्याला हार न दाखवता जिंकवून देतील अशी आशा वर्मांना आहे.

First Published on: October 19, 2019 5:37 AM
Exit mobile version