मनोज तिवारींचा मनसेला टोला; म्हणे, ‘धडा शिकवणार’

मनोज तिवारींचा मनसेला टोला; म्हणे, ‘धडा शिकवणार’

राज ठाकरे आणि मनोज तिवारी

भोजपुरी अभिनेते आणि भाजप खासदार मनोज तिवारी यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर नाव न घेता टीका केली आहे. कल्याणमध्ये आयोजित प्रचारसभेत ते बोलत होते. कल्याण पूर्वचे भाजप उमेदवार गणपत गायकवाड यांच्या प्रचाराप्रत्यर्थ ते कल्याणला आले होते. यावेळी ते उत्तर भारतीय मतदारांना भोजपुरीत संबोधित करत होते. ‘प्रांताच्या नावाखाली काही लोक आमचे ठेले आणि गाड्या उधळणार असतील, तर त्यांना धडा शिकवणार’, असे मनोज तिवारी म्हणाले.

नेमके काय म्हणाले मनोज तिवारी?

‘शिवसेनेचे लोक आमच्या सोबत आहेत. पण शिवसेनेतून वेगळे होऊन बाहेर पडलेले जे लोक आहेत, मला त्याचे नाव घेण्याची गरज नाही. सगळ्यांना माहित आहे ते कोण आहेत ते. प्रांताच्या नावाखाली जर ते आमचे ठेले आणि गाड्या उधळणार असतील, तर त्यांना धडा शिकवणार’, असे मनोज तिवारी म्हणाले. ‘मुंबई, ठाणे, वाशी, ऐरोलीमध्ये काही जणांना निघृणपणे मारहाण केली जाते. कारण ते उत्तर भारतीय आहेत. मी तर हिरो आहे. चित्रपट करायचो, गाणी गायचो. मात्र अचानक माझ्यामध्ये नेता संचारला. मी या गोष्टीचा विरोध करायचे ठरवले आणि रस्त्यावर उतरलो. मी विरोध केला आणि त्यानंतर माझा विरोध झाला’, असेही मनोज तिवारी म्हणाले.


हेही वाचा – ‘१५ ते २० दिवसांत हेमा मालिनींच्या गालासारखे रस्ते चकाचक होतील’

First Published on: October 16, 2019 1:02 PM
Exit mobile version