मनसेची ४५ उमेदवारांची दुसरी यादी जाहीर

मनसेची ४५ उमेदवारांची दुसरी यादी जाहीर

मनसे अध्यक्ष राज ठाकरे

विधानसभा निवडणुकीसाठी मनसेची दुसरी यादी जाहीर झाली असून या पहिली यादीत ४५ उमेदवारांची नावे घोषित करण्यात आली आहेत. दोन दिवसांपूर्वीच मनसेने त्यांची पहिली यादी जाहीर केली होती. मनसेच्या दुसऱ्या यादीतही बाळा नांदगावकर यांचे नाव नाही. त्यामुळे बाळा नांदगावकर निवडणूक लढवणार की नाही याबाबतही चर्चा सुरु झाल्या आहेत. पहिल्या यादीत यामध्ये मनसेचे नेते संदीप देशपांडे यांना माहिम मतदारसंघातून उमेदवारी जाहीर झाली होती. तर मनसे ठाणे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांना ठाणे विधानसभा मतदारसंघासाठी उमेदवारी जाहीर झाली होती. यासोबतच कल्याण ग्रामीण विधानसभा मतदारसंघासाठी राजू पाटील यांना उमेदवारी देण्यात आली होती. त्याचबरोबर अखिल चित्रे यांना वांद्रे पूर्व मतदारसंघातून उमेदवारी जाहीर झाली होती. आहे. मंगळवारी संध्याकाळी मनसेचे नेते शिरीष सावंत यांनी ही यादी जाहीर केली आहे.

First Published on: October 2, 2019 7:33 PM
Exit mobile version