खासदार डॉ. अमोल कोल्हे यांची ‘एक सभा अशीही’!

खासदार डॉ. अमोल कोल्हे यांची ‘एक सभा अशीही’!

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काल, गुरुवारी पिंपरी चिंचवड आणि भोसरी या ठिकाणी खासदार डॉ. अमोल कोल्हे यांच्या सभा नियोजित होत्या. परंतु ऐनवेळी पूर्वपरवानगी असतानाही एरंडोलमधून हेलिकॉप्टर उड्डाणासाठी परवानगी नाकारण्यात आली. नंतर औरंगाबाद येथे जाऊन चार्टर्ड विमानाने पुणे येथे येण्यासाठी प्रयत्न केला. पण आश्चर्य म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी सर्किटमध्ये नसताना औरंगाबादची परवानगीसुद्धा नाकारण्यात आली. त्यामुळे अमोल कोल्हे यांनी एरंडोलवरून पुण्यापर्यंत रस्त्याच्या मार्गाने प्रवास केला.

नियोजित सभा रद्द करावी लागल्याची रुखरुख

चिंचवड आणि भोसरी दोन्ही ठिकाणी सांगितले की शक्य झाल्यास लाईव्ह स्क्रिनिंग करू. परंतू, डिजिटल इंडियाच्या दैदिप्यमान यशामुळे शक्य झाले नाही. तरीही चिंचवड आणि भोसरीच्या मायबाप मतदारांना अमोल कोल्हे यांनी संबोधित केले. समोर श्रोते नसताना एक सभा अशीही झाली रस्त्याच्या कडेला…, वक्ता चांदवड नाशिक येथे आणि मायबाप मतदार भोसरी आणि चिंचवड मध्ये!, असे अमोल कोल्हे यांनी सांगितले.

काय म्हणाले खासदार

भोसरी विधानसभेचे राष्ट्रवादी पुरस्कृत उमेदवार विलास विठोबा लांडे यांना कपबशी समोरील बटण दाबून आणि चिंचवड विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसने पाठिंबा दिलेले अपक्ष उमेदवार राहुल तानाजी कलाटे यांना बॅटच्या चिन्हासमोरील बटण दाबून आणि पिंपरी विधानसभेतील राष्ट्रवादी काँग्रेस,काँग्रेस आणि मित्रपक्षांचे उमेदवार अण्णा बनसोडे यांना घड्याळ चिन्हसमोरील बटण दाबून प्रचंड मताधिक्याने विजयी करा ही कळकळीची विनंती!

हेही वाचा –

बंडखोर तृप्ती सावंत यांची अखेर शिवसेनेतून हकालपट्टी

First Published on: October 18, 2019 11:16 AM
Exit mobile version