Raj Thackeray Rally : ‘मुंबईत चौथी भाषा आणलीत तर परत बांबू’!

Raj Thackeray Rally : ‘मुंबईत चौथी भाषा आणलीत तर परत बांबू’!

राज ठाकरे

मुंबईत वांद्रे आणि गोरेगावमध्ये सभा घेतल्यानंतर राज ठाकरेंच्या ११ ऑक्टोबरला मुंबईतच तीन सभा होणार आहेत. त्यात भांडुपमध्ये राज ठाकरेंची पहिली सभा झाली. त्या सभेत त्यांनी मतदानाचं राजकारण आणि आपली विरोधी पक्षाची भूमिका पुन्हा एकदा मतदारांना सांगितली. ‘गेल्या ५ वर्षांपासून जाहीरनामे जाहीर करायचे आणि त्यानंतर त्यावर काहीही करायचं नाही. आणि मतदारांना देखील त्यातलं काहीही आठवत नाही. इथे निवडणुकांचं कुणाला काही पडलेलंच नाही’, असं राज ठाकरे यावेळी म्हणाले. तसेच, यावेळी त्यांनी शिवसेना आणि भाजपचे गेल्या निवडणुकीतले जाहीरनामे देखील वाचून दाखवले.  
A view of the sea
Pravin Wadnere

मी लंडनला असताना मला एक मराठी आर्किटेक्ट मुलगा भेटायला आला होता. त्यानी मला सांगितलं की आपल्याकडे भंगारच्या असतात तशी एक जागा लंडनच्या आजूबाजूला होती. तिथल्या सरकारने तिथे लोकांना परवडणाऱ्या दरामध्ये घरं बांधून द्यायचं ठरवलं. त्यासाठीच्या काढल्या गेलेल्या टेंडरमध्ये सगळ्यात महत्त्वाची एक अट होती. ती म्हणजे तुम्ही बांधाल त्या प्रत्येक घरात सूर्यप्रकाश पोहोचायला हवा. मुंबईत बांधल्या जाणाऱ्या किती घरांमध्ये असा सूर्यप्रकाश पोहोचतो? – राज ठाकरे

Pravin Wadnere

आमच्याकडे परिस्थितीमध्ये बदल होत नाही. पण रोजच्या रोज परिस्थिती अजून खराब होत चालली आहे – राज ठाकरे

Pravin Wadnere

कोकणाचा कॅलिफोर्निया करू अशा अनेक घोषणा झाल्या. तेव्हा सगळे टाळ्या वाजवायचे. मग त्यांनी टेलिव्हिजनवर बेवॉच सिनेमा पाहिला. मग सगळ्यांना कळलं कॅलिफोर्निया काय आहे ते – राज ठाकरे

Pravin Wadnere

एका दिवसात ३ सभ कशा घ्यायच्या, हा प्रश्नच पडतो – राज ठाकरे

Pravin Wadnere

भांडुपमधली सभा झाल्यानंतर अर्ध्या तासात राज ठाकरे विक्रोळीमध्ये सभेसाठी दाखल

First Published on: October 11, 2019 7:27 PM
Exit mobile version