लिलावती रुग्णालयात संजय राऊत आणि शरद पवार यांची भेट

लिलावती रुग्णालयात संजय राऊत आणि शरद पवार यांची भेट

शिवसेनेचे नेते संजय राऊत यांच्या छातीत दुखू लागल्यामुळे त्यांना सोमवारी लिलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले. तिथे त्यांच्यावर सोमवारी रात्री शस्त्रक्रिया करण्यात आली असल्याची माहिती समोर आली आहे. त्यानंतर आज त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली. दरम्यान, संजय राऊत यांच्या प्रकृतीच्या चौकशीसाठी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि त्यांच्या कन्या सुप्रिया सुळे लिलावती रुग्णालयात गेले आहेत. गेल्या १५ दिवसांत संजय राऊत यांनी अनेक वेळा शरद पवार यांची भेट घेतली आहे.


हेही वाचा – संजय राऊतांची अँजिओग्राफी झाली, ह्रदयात २ ब्लॉक!


 

सत्ता स्थापनेच्या पेचाबाबत चर्चा होण्याची शक्यता

शरद पवार आणि सुप्रिया सुळे लिलावती रुग्णालयात संजय राऊत यांच्या प्रकृतीच्या विचारपूस करण्यासाठी गेले असल्याची माहिती समोर येताच रुग्णालयात पवार आणि राऊत यांच्यात सत्ता स्थापनेच्या पेचाबाबत चर्चा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

First Published on: November 12, 2019 10:36 AM
Exit mobile version