अजित पवार दिशाभूल करतायत, आम्ही शिवसेना-काँग्रेससोबत – शरद पवार

अजित पवार दिशाभूल करतायत, आम्ही शिवसेना-काँग्रेससोबत – शरद पवार

राष्ट्रवादी काँग्रेसचे हकालपट्टी झालेले नेते अजित पवार आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यामध्ये ट्विटरव चांगलीच जुंपली आहे. काही वेळापुर्वी अजित पवार यांनी ट्विट करत, मी राष्ट्रवादीसोबतच असून शरद पवार माझे नेते आहेत. तसेच राष्ट्रवादी-भाजप मिळून महाराष्ट्राला पाच वर्ष स्थिर सरकार देणार असे म्हटले होते. त्यानंतर शरद पवार यांनी तात्काळ ट्विट करत अजित पवार महाराष्ट्रातील जनतेची दिशाभूल करत असल्याचा आरोप केला आहे. आम्ही भाजपसोबत सत्ता स्थापन करणार नसून काँग्रेस आणि शिवसेनेसोबतच जाणार आहोत, असे स्पष्टीकरण शरद पवार यांनी ट्विटरवर दिले आहे.

थोड्या वेळापूर्वीच अजित पवार यांनी ट्विट करुन मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातच असून शरद पवार माझे नेते असल्याचे म्हटले होते. तसेच महाराष्ट्राला राष्ट्रवादी-भाजप मिळून स्थिर सरकार देणार असे सांगितले होते.

 

First Published on: November 24, 2019 6:12 PM
Exit mobile version