शिवसेनेच्या पाठींब्यावरुन काँग्रेस-राष्ट्रवादीत वाद

शिवसेनेच्या पाठींब्यावरुन काँग्रेस-राष्ट्रवादीत वाद

उपमुख्यमंत्री अजित पवारांची केंद्राकडे मागणी

एकट्या राष्ट्रवादीने पाठींबा देऊन काही फायदा होणार नाही. काँग्रेस आणि राष्ट्रवादीची आघाडी आहे. विधानसभा निवडणूक आम्ही दोघांनी एकत्र लढली त्यामुळे आताही दोघांनी एकत्र निर्णय घेणं गरजेचं आहे. त्यामुळे थोडं सबुरीने घ्यावं लागेल, असे अजित पवार यांनी सांगितले आहे.

निवडणुकीचे निकाल लागून तीन आठवडे झाले आहेत. तरीही सत्ता स्थापनेचा तिढा सुटलेला नाही. भाजपने सत्तास्थापनेला नकार दिल्यानंतर शिवसेनेला दुसरा मोठा पक्ष म्हणून राज्यपालांनी सत्तास्थापनेसाठी बोलावले होते. पण, काँग्रेस आणि राष्ट्रवादीने पाठींब्याचे पत्र पाठवले नसल्याकारणाने शिवसेना सत्ता स्थापनेचा फक्त दावा करुन बाहेर आले. शिवसेनेने वाढवून मागितलेल्या वेळेलाही राज्यपालांनी नकार दिला. त्यामुळे, आज राज्यपालांनी तिसरा मोठा पक्ष म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसला सत्ता स्थापनेच्या दाव्यासाठी बोलावले आहे. पण, राष्ट्रवादी आणि काँग्रेसला ही सत्ता स्थापनेला शिवसेनेची गरज असल्याचे अजित पवार यांनी स्पष्ट केले आहे.

दरम्यान, काँग्रेसचे नेते माणिकराव ठाकरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यामुळे उशीर होत असल्याचे म्हटले. तर अजित पवार यांनी काँग्रेसमुळे समर्थन देता आले नसल्याचे म्हटले. त्यामुळे आता शिवसेनेच्या पाठींब्यावरुन काँग्रेस आणि राष्ट्रवादीमध्येही जुंपली असल्याचे सध्या चित्र पाहायला मिळत आहे.

काय म्हणाले अजित पवार?

एकट्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या पत्राने काहीही झाले नसते. आम्ही देखील काँग्रेसच्या पत्राची वाट पाहत होतो. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र निवडणूक लढल्याने दोघांनीही एकत्र हा निर्णय घेणे अपेक्षित होते. काँग्रेसचे आमदार सध्या जयपूरला असल्यामुळे त्यांच्याशी संपर्क साधण्यात अडचण येत आहे. काँग्रेस सोबत आली तरच यातून काही मार्ग निघू शकतो, असे पवार यावेळी म्हणाले.

हेही वाचा –

लिलावती रुग्णालयात संजय राऊत आणि शरद पवार यांची भेट

First Published on: November 12, 2019 11:52 AM
Exit mobile version