फक्त फोटो आणि सेल्फी काढण्यासाठी मतदान करू नका – सोनाली कुलकर्णी

फक्त फोटो आणि सेल्फी काढण्यासाठी मतदान करू नका – सोनाली कुलकर्णी

सोनाली कुलकर्णी

फोटो आणि सेल्फी काढण्यासाठी मतदान करू नका, विचारपूर्वक मत द्या, अत्यंत गरजेचं आहे. धर्म, जात या विषयावर विचार न करता वैक्तिक उमेदवारांचे शिक्षण आणि कार्यक्षमता आहे का, त्याचा विचार करा, असे आवाहन मराठी सिने अभिनेत्री सोनाली कुलकर्णी यांनी केले आहे. त्या पिंपरी-चिंचवडमध्ये पत्रकारांशी बोलत होत्या.

हेही वाचा- #HaryanaAssemblyPolls : मुख्यमंत्री मतदानासाठी आले सायकलवर!

दरवेळीप्रमाणे सोनाली या निगडी प्राधिकरण येथील ज्ञानप्रबोधन शाळेत त्या मतदान करण्यास आल्या होत्या. यावेळी त्यांच्यासोबत आई-वडील आणि भाऊ होते. त्यांना पाहण्यासाठी मतदारांनी गर्दी केली होती. सोनाली कुलकर्णीचा हिरकणी हा मराठी चित्रपट याच आठवड्यात प्रदर्शित होणार आहे. तेव्हा, तिने या चित्रपटाचे प्रमोशन केले. प्रत्येक सेल्फी काढणाऱ्या व्यक्तीला हिरकणी चित्रपटाविषयी त्या विचारत होत्या.

हेही वाचा – दिग्गजांनी बजावला मतदानाचा हक्क

सोनाली कुलकर्णी म्हणाल्या, सोशय मीडियावर तुम्ही खूप तत्परतेने मतं मांडता. तुम्हाला खूप बोलायचं असत, पण जिथे मत मांडायचं असत तिथे का कमी पडता?, असा सवाल त्यांनी तरुणांना केला आहे. या वेळेला ही टक्केवारी वाढवूया, पावसाळी वातावरण असले तरी बाहेर पडून मतदान करा. या प्रक्रियेत युवा पिढीने सहभाग घेतला पाहिजे, ज्येष्ठ नागरिक मोठ्या प्रमाणावर दिसत आहेत, असे आवाहन तिने मतदार राजाला केले आहे. तुम्हाला पुढील पाच वर्षे कशी हवी आहेत तुमच्या मनाप्रमाणे हवी असतील तर मत मांडणे गरजेचे आहे, असेही त्या म्हणाल्या.

First Published on: October 21, 2019 12:39 PM
Exit mobile version