मुंबईत ५२१ मतदान केंद्रावर टोकन सिस्टिम

मुंबईत ५२१ मतदान केंद्रावर टोकन सिस्टिम

टोकन सिस्टिम

शहरातील एकुण ५२१ मतदान केंद्रावर यंदाच्या विधानसभा निवडणुकीसाठी टोकन सिस्टिम असणार आहे. त्यामुळे मतदानासाठी लागणार्‍या लांबच लांब रांगांमध्ये अडखळण्याची वेळ यंदा मतदारांवर येणार नाही. मतदारांच्या सुविधेसाठी यंदा प्रतिक्षा कक्षांची उभारणी करण्यात येणार आहे अशी माहिती मुंबई जिल्हाधिकारी आणि जिल्हा निवडणुक अधिकारी शिवाजी जोंधळे यांनी दिली.

जेष्ठ मतदार आणि दिव्यांग मतदारांना विधानसभा निवडणुकीसाठीही मतदानासाठी प्राधान्य देता येणार आहे. त्यामुळे सर्वसामान्य मतदारांची रांग वाढतानाच काही तास लागल्याचा अनुभवही अनेक मतदारांना आला होता. यंदाच्या विधानसभा निवडणुकांमध्ये मतदारांसाठी गैरसोय होऊ नये म्हणून मुंबई जिल्हा निवडणुक कार्यालयाने टोकन सिस्टिमसाठी पुढाकार घेतला आहे. या टोकनमुळे मतदारांना रांगेमध्ये ताटकळत बसावे लागणार नाही. बँकासारखाच टोकन सिस्टिमचा अनुभव मतदारांना येणार आहे. त्यामुळे मतदारांची गैरसोय कमी होईल असे जोंधळे यांनी स्पष्ट केले.

अशी असेल टोकन सिस्टिम

मतदान केंद्रावर गेल्यावर मतदारांना टोकन देण्यात येणार आहे. टोकन नुसार मतदारांच्या टोकनची घोषणा केली जाईल. टोकन नुसार मतदारांना मतदानाचा हक्क बजावता येईल. टोकन मिळाल्यावर प्रतिक्षेसाठी उभारलेल्या शेड किंवा मंडपात मतदारांची बसण्याची व्यवस्थाही करण्यात आली आहे.

First Published on: October 21, 2019 5:31 AM
Exit mobile version