आता त्या पालखीत शिवसैनिकाला बसवणार – उद्धव ठाकरे

आता त्या पालखीत शिवसैनिकाला बसवणार – उद्धव ठाकरे

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

मुख्यमंत्री कोण होणार, यावरून सध्या शिवसेना-भाजपमध्ये घमासान सुरू असताना मुख्यमंत्री शिवसेनेचा होणार यावर उद्धव ठाकरे ठाम असून, आज, रविवारीदेखील त्यांनी आमदारांसोबत झालेल्या बैठकीत मुख्यमंत्री शिवसेनेचा होईल, असे सांगत ‘आतापर्यंत आपण पालखीचे भोई होतो, आता यापुढे आपण पालखीचे भोई होणार नाही’, असे आमदारांना सांगितल्याचे खात्रीलायक सुत्रांनी सांगितले. मढ येथील द रिट्रीट या पंचतारांकित हॉटेलमध्ये शिवसेनेचे सर्व आमदार असून या आमदारांशी उद्धव ठाकरे यांनी चर्चा केली.

नेमकं काय म्हणाले उद्धव ठाकरे

शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी आमदारांच्या बैठकीत आक्रमक होत शिवसेनेची भूमिका मांडली. आतापर्यंत आपण पालखीचे भोई होतो… आता यापुढे आपण पालखीचे भोई होणार नाही…, तर आता मी त्याच पालखीत शिवसैनिकाला बसवल्याशीवाय रहाणार नाही, असे सांगितल्याची माहिती सूत्रांनी दिली. सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे या बैठकीला उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे या देखील उपस्थित होत्या.

हेही वाचा –

भाजपची चार वाजता पुन्हा बैठक; राज्यपालांच्या निमंत्रणाला आज उत्तर देणार

First Published on: November 10, 2019 3:29 PM
Exit mobile version