Maharashtra Monsoon Session 2023 : मुंबईतील प्रकल्पग्रस्तांसाठी उद्योगमंत्री उदय सामंत यांची मोठी घोषणा

Maharashtra Monsoon Session 2023 : मुंबईतील प्रकल्पग्रस्तांसाठी उद्योगमंत्री उदय सामंत यांची मोठी घोषणा

मुंबईतील प्रकल्पग्रस्तांसाठी उद्योगमंत्री उदय सामंत यांची मोठी घोषणा

मुंबई : मुंबईतील प्रकल्पग्रस्तांना त्यांच्याच मुळ परिसरात घरे देण्याचा मुद्दा आज विधान परिषदेत उपस्थित करण्यात आला. वरळीतील वरळीतील गणपतराव कदम मार्ग, केशवराव खाडे मार्ग, डॉ. ई मोजेस मार्गावरील रस्ता रुंदीकरणात बाधित होणाऱ्या अनिवासी गाळेधारकांच्या घरांसंबंधिचा प्रश्न आमदार सुनील शिंदे यांनी उपस्थित केला. याच प्रश्नाला धरून आमदार सचिन आहिर यांनी देखील प्रश्न उपस्थित केला. (Maharashtra Monsoon Session 2023 : Industries Minister Uday Samant big announcement for project victims in Mumbai)

हेही वाचा – तलाठी भरतीसाठी मुदत वाढवा, रोहित पवारांच्या मागणीनंतर फडणवीसांची मोठी घोषणा

विरोधकांच्या या प्रश्नाला उत्तर देत उद्योगमंत्री उदय सामंत यांनी महत्त्वाची घोषणा केली. मुंबईतील प्रकल्पग्रस्तांना ते राहतात त्याच परिसरात घरे देण्याचा प्रयत्न करू अशी घोषणा मंत्री सामंत यांनी केली. तसेच वरळीतील गणपतराव कदम मार्ग, केशवराव खाडे मार्ग, डॉ. ई मोजेस मार्गावरील रस्ता रुंदीकरणात बाधित होणाऱ्या अनिवासी गाळेधारकांना आधी घरे दिली जाईल. मग कामाला सुरूवात केली जाणार असल्याचेही सामंत यांच्याकडून सांगण्यात आले.

यावेळी मंत्री उदय सामंत यांनी वरळीतील घरांच्या मुद्द्यावरून ठाकरे गटाचे युवानेते आदित्य ठाकरे यांना टोला लगावला. यावेळी बोलताना सामंत म्हणाले की, प्रकल्पबाधितांच्या घरांच्या विषयावर आमदार आदित्य ठाकरे यांनी काही दिवसांपूर्वी सह्यांची मोहीम राबवली होती. पालिकेकडून आलेल्या नोटीसांमुळे परिसरातील शेकडो नागरिकांमध्ये होते भीतीचे वातावरण आहे. या प्रश्नाबाबत एक समिती स्थापन केली जाईल. प्रश्न वरळीचा असून या समितीत वरळीतला कोण एक आमदार असणार हे ठरवून सांगा. कारण वरळीत सध्या तीन आमदार आहेत.

विधान परिषेदत आज पणन मंत्री अब्दुल सत्तार यांनी देखील कांदा उत्पादकांच्या अनुदानासंदर्भात महत्त्वाची घोषणा केली. शेतकऱ्यांना कांदा उत्पादनासाठी आवश्यक बी बियाणे कृषी व पणन विभागतर्फे उपलब्ध करून देण्यात येईल. तसेच शेतकऱ्यांनी कांदा थेट बाजारात विकल्यास सरकार त्याचा विचार करेल, आणि महत्त्वाचे म्हणजे पुरवणी मागणी मान्य झाल्यास कांदा उत्पादकांना लगेच पैसे देण्यात येतील, तसेच 15 ऑगस्टच्या आधी कांदा उत्पादकांच्या खात्यावर पैसे जमा करण्यात येतील, अशी महत्त्वाची घोषणा अब्दुल सत्तार यांच्याकडून विधान परिषदेत करण्यात आली.

First Published on: July 19, 2023 5:03 PM
Exit mobile version