घरताज्या घडामोडीतलाठी भरतीसाठी मुदत वाढवा, रोहित पवारांच्या मागणीनंतर फडणवीसांची मोठी घोषणा

तलाठी भरतीसाठी मुदत वाढवा, रोहित पवारांच्या मागणीनंतर फडणवीसांची मोठी घोषणा

Subscribe

राज्यात भरती प्रक्रियेला सुरूवात झाली असून भूमी अभिलेख विभागामार्फत तलाठी पदांसाठी 4 हजार 644 जागांवर भरती निघाली आहे. या भरतीसाठी सोमवारपर्यंत दहा लाखांवर अर्ज प्राप्त झाले आहेत. तसेच अर्ज भरण्याची अंतिम तारीख 17 जुलै होती, पण शासनाने ती एक दिवस वाढवून भरती प्रक्रियेत असलेल्या उमेदवारांना दिलासा दिला होता. त्यानुसार 18 जुलैपर्यंत ही डेडलाईन ठेवण्यात आली होती. मात्र, राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी भरतीसाठीचा मुद्दा उपस्थित करत आणखीन काही दिवस मुदत वाढवण्याची मागणी विधानसभेत केली. त्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठी घोषणा केली.

- Advertisement -

तलाठी पदभरतीसाठी अर्जाची संख्या अपेक्षेपेक्षा अधिक आल्याने उमेदवारांना अर्ज करणे आणि परीक्षा शुल्क भरण्यासाठी एक दिवसाची मुदत वाढवून देण्यात आली होती. आता, ही मुदत आणखी वाढविण्याची मागणी आमदार रोहित पवार यांनी केली. त्यावर आपण 1 दिवसांसाठी ही मुदत वाढवली होती. मात्र, आणखी ही मुदत 15-20 दिवस वाढविण्यासाठी महसूलमंत्र्यांना विनंती केली होती. त्यानुसार याला मुदतवाढ देण्यात आल्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.

महाराष्ट्रातील सहा विभागाअंतर्गत येणाऱ्या 36 जिल्ह्यांतील 4 हजार 644 पदांची भरती केली जाणार आहे. यामध्ये पुणे, नाशिक, नागपूर, औरंगाबाद, कोकण तसेच अमरावती या विभागांचा समावेश आहे.

- Advertisement -

हेही वाचा : आम्ही वंदे मातरम् बोलू शकत नाही कारण…, अबू आझमींच्या वक्तव्यावर देवेंद्र फडणवीस कडाडले


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -