Friday, May 17, 2024
घरमानिनीReligiousमहिलांनी हातात बांगड्या का घालाव्यात ?

महिलांनी हातात बांगड्या का घालाव्यात ?

Subscribe

स्त्रियांच्या हातातील बांगड्या फक्त त्यांचे सौंदर्य वाढवत नाही तर त्यांचे होणारे फायदे ऐकून तुम्हालाही आश्चर्य वाटेल. सौभाग्यवती महिलांसाठी बांगड्याला अनन्यसाधारण महत्त्व आहे. काचेची बांगडी असो किंवा सोने-चांदी, श्रृंगारात या बांगड्यांना विशेष महत्त्व आहे. ज्योतिषशास्त्राच्या दृष्टीने बांगड्यांना खूप महत्त्व आहे. महिलांनी नियमितपणे बांगड्या घातल्यास त्यांना अनेक आश्चर्यकारक फायदे मिळू शकतात.

बांगड्या घालण्याचे महत्त्व

परंपरेने विवाहित महिलांनी बांगड्या घातल्या नाहीत तर ते अशुभ मानले जाते. कारण असे मानले जात होते की ज्या स्त्रिया बांगड्या घालत नाहीत त्यांच्यामध्ये नकारात्मक ऊर्जा आकर्षित होते. हिंदू संस्कृतीत असे मानले जाते की विवाहित महिलांनी बांगड्या घातल्याने पतीचे वय वाढते. 16 अलंकारांपैकी हा एक अत्यावश्यक अलंकार मानला जातो. यामुळेच दुर्गादेवीला मेकअपच्या वस्तू अर्पण केल्या जातात तेव्हा त्यात बांगड्यांचा समावेश नक्कीच केला जातो

- Advertisement -

बांगड्या घालण्याचे आरोग्याला होणारे फायदे

  • जुन्या काळी सोन्या-चांदीच्या बांगड्या घातल्या जायच्या. सोन्या-चांदीच्या संपर्कात आल्याने या धातूंचे गुणधर्म शरीरात सापडू लागतात. ज्यामुळे स्त्रीला शक्ती मिळते.
  • आयुर्वेदानुसार सोन्या-चांदीच्या बांगड्या घातल्याने शरीराशी घर्षण होते. ज्यामुळे शरीराला ताकद मिळते. तसेच महिलांना आरोग्यासाठी फायदे ही मिळतात.
  • बांगड्या घातल्याने श्वसन आणि हृदयाशी संबंधित समस्या कमी होतात. बांगड्या घातल्याने मानसिक संतुलनही सुधारते आणि महिलांना कमी थकवा जाणवतो.
  • विज्ञानानुसार मनगटाच्या खाली एक्यूप्रेशर पॉइंट्स असतात. त्यांच्यावरील दबावामुळे शरीर निरोगी राहते. अशा परिस्थितीत हातात बांगड्या घालून महिला उत्साही राहतात.

बांगडीची अख्यायीका 

ज्या ठिकाणी महिलांच्या हातातील बांगड्याचा आवाज राहतो, त्या ठिकाणी देवी देवतांची विशेष कृपा राहते. अशा घरामध्ये सुख, शांती, स्मृती राहते अशी अख्यायीका आहे. फक्त बांगड्या घातल्याने सकारात्मक फळे प्राप्त होऊ शकत नाहीत व नकारात्मकता बाहेर जाऊ शकत नाही. म्हणून पूर्वी स्त्रिया बांगड्या घालयच्या आता बांगड्याच्या ऐवजी अनेक वस्तू किंवा ब्रेसलेट इतर गोष्टी परिधान करतात.

हेही वाचा : Astrology – या डाळींचे दान केल्याने उजळेल नशीब

__________________________________________________________________

- Advertisement -

Edited By : Nikita Shinde

- Advertisment -

Manini