विधानभवनातील शिवाजी महाराजांचा पुतळा हटवणार!

विधानभवनातील शिवाजी महाराजांचा पुतळा हटवणार!

होय! शिवाजी महाराजांचा विधामभवनातील पुतळा आता काढण्यात येणार आहे. विधानभवनात प्रवेश केल्यानंतर उजव्या हाताला महाराजांचा सिंहासनावर बसलेला पुतळा आहे. त्याकडे पाहिल्यानंतर आपण महाराजांपुढे नतमस्तक होतो. पण, महाराजांचा हाच पुतळा आता हटवला जाणार आहे. पण, तुम्ही मात्र काहीही काळजी करून नका. कारण त्या ठिकाणी आता महाराजांचा नवा आणि मोठा पुतळा बसवला जाणार आहे. सिंहासनावर असलेला महाराजांचा पुतळा हा विधीमंडळच्या इतर पुतळ्यांच्या तुलनेत आकाराने लहान आहे. तसंच हा पुतळा ज्या चौथाऱ्यावर आहे तो चौथरा आकाराने मोठा आणि महाराजांचा पुतळा लहान असे त्याचे स्वरूप झाले आहे. तेव्हा सध्याचा पुतळा योग्य ठिकाणी लावावा आणि त्या जागी छत्रपती शिवाजी महाराजांचा मोठा पुतळा बसवावा अशी मागणी विधानपरिषद सदस्य निलय नाईक यांनी केली. त्यानंतर क्षणाचाही विलंब न लावता ही सुचना योग्य असल्याचं सांगत विधानपरिषदेचे सभापती रामराजे निंबाळकर यांनी नव्या पुतळ्याबाबत घोषणा देखील केली. शिवाय, दोन्ही सभागृहातील नेत्यांनी त्याला लगेचच संमती देखील दिली.

यावर बोलताना, महाराजांचा विधानभवनातील पुतळा हलवून तो नागपूर विधानभवनात पाठवला जाणार आहे. त्यानंतर त्याठिकाणी महाराजांचा भव्य पुतळा उभारणार असल्याची माहिती विनोद तावडे यांनी दिली.

First Published on: November 30, 2018 6:19 PM
Exit mobile version