Astrology: मंगल -शनिची युती ‘या’ ३ राशींसाठी अशुभ,  तुमची रास कोणती?

ज्योतिष शास्त्रानुसार प्रत्येक ग्रहाचे स्थान परिवर्तन, उद्य, अस्त आणि वक्री – मार्गिकेचा परिणाम १२ राशींवर होत असतो. सर्व नवग्रह एका ठराविक कालावधीनंतर आपले स्थान बदलत असतात. तसेच जेव्हा एक किंवा अनेक ग्रह एकत्र कुंडलीच्या एका घरात प्रवेश करतात तेव्हा ग्रहांच्या या स्थितीला युती असे म्हटले जाते. याचा परिणाम व्यक्तींवर होतो.

ज्योतिष शास्त्रानुसार शत्रु असलेले दोन ग्रह मंगळ आणि शनि २९ एप्रिल ते १७ मे पर्यंत एकाच राशीत ठाण मांडणार असून युती करणार आहेत. २९ एप्रिल २०२२ सकाळी ९ वाजून ५७ मिनिटांनी शनि कुंभ राशीत गोचर करणार आहे. यामुळे कुंभ राशीत आधीपासूनच स्थान मांडून असलेल्या मंगळाशी त्याची युती होणार आहे. यामुळे द्वंद योग निर्माण होणार असून हा अशुभ योग असल्याचे सांगितले जाते. ज्या राशींमध्ये या ग्रहांची युती होईल त्यांच्यावर या ग्रह युतीचा नकारात्मक प्रभाव पडेल.

या राशींसाठी अशुभ आहे मंगळ शनि युती

कर्क रास- या राशीमध्ये अष्टम भावात शनि मंगळाची युती होणार आहे. यामुळे या राशीच्या व्यक्तींना अपघाताचा धोका आहे. तसेच कामाच्या ठिकाणी जोखीम घेणे या व्यक्तींनी तूर्तास टाळावे. तसेच या कालावधीत अप्रिय घटना घडण्याची शक्यता आहे.

कन्या रास- या राशीच्या सहाव्या स्थानात शनि मंगळाची युती होईल. यामुळे तब्येतीसंदर्भात तक्रारी वाढण्याची शक्यता आहे. त्यासाठी खाण्यापिण्याकडे लक्ष देणे गरजेचे आहे. अन्यथा औषध उपचारांवर सर्वाधिक खर्च करावा लागेल. ५० हून अधिक वय असलेल्या व्यक्तींनी या काळात अतिश्रम टाळावे.

कुंभ रास- शनि मंगळाची ही युती कुंभ राशीसाठी डोकेदुखी ठरणार आहे. याकाळात नकारात्म विचार वाढतील. राग, चिडचिड आणि अहंकार वाढेल .खासगी आयुष्याबरोबरच कामाच्या ठिकाणी सावध राहावे लागेल. जोडीदाराबरोबर आणि सहकाऱ्यांबरोबरचे वाद विकोपाला जातील. प्रतिष्ठेला धक्का लागणाऱ्या घटना घडतील.

शनि मंगळाच्या अशुभ युतीपासून असा बचाव करा

दर मंगळवारी बजरंगबाणाचे पठण करावे.

तसेच शनि आणि मंगळाशी संबंधित वस्तुंचे दान करावे

शनि आणि मंगळग्रहाच्या शांतीसाठी मंत्रजप करावा

शनि मंगळ ग्रह दोष दूर करण्यासाठी होम हवन करणेही फायदेशीर ठरेल.

First Published on: April 29, 2022 2:36 PM
Exit mobile version