लहान मुलांना काळा टीक्का का लावला जातो? जाणून घ्या वैज्ञानिक कारण…

लहान मुलांना काळा टीक्का का लावला जातो? जाणून घ्या वैज्ञानिक कारण…

आपल्याकडे अनेकदा तुम्ही पाहिले असेल लहान मुलांना वाईट नजरेपासून वाचवण्यासाठी काजळाचा काळा टिक्का लावला जातो. शिवाय अनेकदा मुलांच्या पायात काळा धागाही बांधला जातो. असं म्हणतात की, असे केल्याने मुलांवर वाईट शक्तींचा प्रभाव पडत नाही तसेच यामुळे नकारात्मक ऊर्जा मुलांपासून दूर राहते. मात्र, या सगळ्या मागे वैज्ञानिक कारणही दडलेलं आहे. जे आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

लहान मुलांना काळा टीक्का का लावला जातो?


जेव्हा कोणतीही व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीला पाहते तेव्हा त्या व्यक्तीच्या मनात सकारात्मक किंवा नकारात्मक असे दोन प्रकारचे विचार येतात. असं म्हणतात जर एखाद्या व्यक्तीने दुसऱ्या व्यक्तीकडे नकारात्मक विचाराने पाहिले तर त्या व्यक्तीभोवती नकारात्मक ऊर्जा संचारते. या उर्जेच्या प्रभावामुळे आरोग्याशी संबंधित अनेक समस्या उद्भवतात. परंतु जेव्हा आपण लहान मुलांना काळा टिक्का लावतो. त्यावेळी ही नकारात्मक ऊर्जा नष्ट होते.

 

हिंदू धर्मातील अनेक मान्यतेमागे वैज्ञानिक कारण देखील जोडलेलं आहे. वैज्ञानिक कारणानुसार, मानवी शरीरात इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन असतात. परंतु जेव्हा लहान मुलांचा विचार केला जातो तेव्हा त्यांच्यामध्ये या रेडिएशनची कमतरता असते. अशा परिस्थितीत जेव्हा एखाद्या व्यक्तीची वाईट नजर मुलांवर पडते तेव्हा मुलांमध्ये असलेल्या या रेडिएशनवर वाईट परिणाम होतो. ज्यामुळे मुलांचे आरोग्य बिघडते. म्हणूनच जेव्हा काळा टीक्का किंवा काळा धागा हातात किंवा पायात बांधला जातो.


हेही वाचा :

प्राचीनकाळातील ‘हे’ दिव्य पुरुष आजही आहेत अस्तित्वात

First Published on: May 6, 2023 4:24 PM
Exit mobile version