कुंडलीतील ‘हे’ योग बनवतात तुम्हांला गरीब-श्रीमंत

जगातील प्रत्येक व्यक्तीला श्रीमंत व्हायचे असते. यासाठी अनेकजण दिवस रात्र कष्टही करत असतात. पण काहींना कमी कष्टात अपार पैसा मिळतो. तर काहीजणांना दिवसरात्र कष्ट करुनही अपेक्षित यश मिळत नाही. यामुळे त्यांच्या घरात अठराविश्व दारिद्र्य असते. ज्योतिषविद्येनुसार या व्यक्तींच्या आयुष्यात घडणाऱ्या प्रत्येक घटनेला त्यांच्या ग्रहांची स्थिती जबाबदार असते. त्यांच श्रीमंत होणं किंवा गरीब राहणं हे देखील त्यांच्या कुंडलीतील काही ठराविक योगांवर अवलंबून असतात. कोणत्या राशींसाठी कोणते योग यश अपयश घेऊन येतात ते बघूया.

मेष- मेषराशीवाल्यांना शुक्र ग्रह लग्नेत गेल्यावर धनवाढीचे योग असतात. तर मंगळ शनिचा योगामुळे जमीन आणि शेतकी व्यवसायातून त्यांना अफाट आर्थिक लाभ होतो.

वृषभ-शुक्र ग्रह बुध आणि गुरुच्या धन स्थानी आल्यावर वक्ता, व्यापारी यांना धनलाभ होतो.

मिथुन-चंद्र आणि गुरु धन भावात मंगळाच्या स्थानी गेल्यास धनलाभाचा योग येतो. अशावेळी कारखाना, उच्च पदस्थ अधिकारी आणि धार्मिक संस्थेतील अधिकारी वर्गाला या योगांमुळे धनलाभ होतो.

कर्क- शुक्र स्थानी बुध आणि गुरु आल्यावर या राशीवाल्यांना मान, सन्मान प्रतिष्ठा लाभते. या राशीवाल्यांकडे धनाची कधीही कमतरता नसते. पाणी आणि काचेशी संबंधित व्यवसायात या राशीवाल्यांना यश मिळते.

सिंह- शुक्र आणि धनस्थानी बुध व गुरु असल्याने या राशीच्या व्यक्तींना कापूस, कागद आणि स्टेशनरी संबंधित व्यवसायांमध्ये लाभ होतो.

कन्या-शुक्र आणि धन स्थानी चंद्र आणि बुध ग्रहाच्या युतिमुळे महाधनी योग तयार होतो. या राशीच्या व्यक्ती कम्प्युटर आणि त्याच्याशी संबंधित व्यवसायात यश प्राप्त करतात.

तूळ- शुक्र आणि सूर्य मंगळ स्थानावर आल्यास या राशीवाल्यांना हॉटेल, रेस्टॉरंट तसेच मशीन संबंधित व्यवसायामध्ये आर्थिक लाभ प्राप्त होतो.

वृश्चिक- शुक्र आणि धनस्थानी गुरु आल्यास विशेष योग तयार होतो. या राशीच्या व्यक्तींना बांधकामक्षेत्राशी संबंधित व्यवसायात लाभ होतो.

धनु- शुक्र आणि धनस्थानात शनि आणि मंगळाचा योग आल्यावर जमीनदार, शेतीशी संबंधित व्यवसायात भरभराट होते.

मकर-मकर लग्नेत शुक्र आणि धन भावात शनि मंगळाचा योग आल्यास मकर राशीवाल्यांना शेतकरी. फार्म , कारखाना तसेच मशीन संबंधित व्यवसायात लाभ असतो.

कुंभ-कुंभ लग्नेत शुक्र आणि धन भावेत शनि मंगळाचा योग आल्यास संपत्तीत वाढ होते. कुंभराशीवाल्यांना मॅकेनिक, विमा तसेच कंत्राटाच्या स्वरुपाच्या कामात यश मिळते.

मीन-मीन लग्नेत शुक्र आणि धन भावात सूर्य आणि मंगळ आल्यास अग्नि संबंधी कार्य अवजड मशीन संबंधी व्यवसायात लाभ अवश्य होतो.

 

 

First Published on: January 22, 2022 8:25 PM
Exit mobile version