krishna janmashtami 2023 : श्रीमंत व्हायचंय? मग कृष्णाष्टमीला करा मोरपंखाचे ‘हे’ उपाय

krishna janmashtami 2023 : श्रीमंत व्हायचंय? मग कृष्णाष्टमीला करा मोरपंखाचे ‘हे’ उपाय

श्रावण महिन्याच्या कृष्ण पक्षातील अष्टमी तिथीला कृष्णाष्टमी साजरी केली जाते. पौराणिक कथेनुसार, यादिवशी मध्यरात्री श्रीकृष्णाचा जन्म झाला होता. श्री कृष्ण हा भगवान विष्णूंचा आठवा अवतार मानला जातो. यंदा कृष्णाष्टमी 6 आणि 7 सप्टेंबर रोजी साजरी केली जाणार आहे.

 

ज्योतिष शास्त्रात मोरपंखांना अत्यंत शुभ मानलं जातं, मोर हा भारताचा राष्ट्रीय पक्षी आहे. भगवान श्रीकृष्णसुद्धा त्यांच्या मुकुटावर मोरपंख धारण करतात. वास्तू शास्त्रामध्ये देखील मोरपंखांना घरात ठेवण्याचे अगणित फायदे सांगितले जातात. मोरपंखांच्या उपायाने अनेक प्रकारच्या दोषांचं निवारण होऊ शकतं. ज्यामुळे तुमच्या आयुष्यातील अनेक समस्यांपासून तुम्हाला सुटका मिळू शकते. या दिवशी श्रीकृष्णांना प्रिय असणाऱ्या मोरपंखाचे काही खास उपाय आम्ही सांगणार आहोत.

मोरपंखाचे 5 चमत्कारी उपाय

जर तुम्ही सतत आर्थिक समस्येचा सामना करत असाल तर जन्माष्टमीच्या दिवशी भगवान श्रीकृष्णाच्या पूजेत 5 मोराची पिसे ठेवावीत आणि नंतर 21 दिवस पूजास्थानी ठेवावीत. यानंतर त्यांना तिजोरीमध्ये ठेवा.

पती-पत्नीमध्ये वारंवार भांडणं होत असतील तर जन्माष्टमीच्या दिवशी बेडरूममध्ये मोराचे पिस ठेवावे. ही मोराची पिसं पूर्व किंवा उत्तर दिशेच्या भिंतीवर लावा. यामुळे वैवाहिक जीवनात गोडवा निर्माण होईल.

घरात वास्तुदोष असल्यास सतत भांडणं होतात. यापासून मुक्ती मिळवण्यासाठी जन्माष्टमीच्या दिवशी मोराच्या पिसांसोबत भगवान श्रीकृष्णाची पूजा करावी आणि नंतर पूर्वेकडील भिंतीमध्ये मोराची पिसे लावावीत.

कुंडलीत ग्रहांचे दोष असल्यास जन्माष्टमीच्या दिवशी बेडरूमच्या पश्चिमेकडील भिंतीवर मोराचे पिसे लावावेत. ग्रह दोषांपासून आराम मिळेल.

मोराचे पंख उशीखाली ठेवून झोपल्याने विद्यालाभ होतो. उशीत मोरपंख ठेवण्यासाठी तुम्ही मोराचे पंख थोडे कापून घ्या. उशीत मोराचे पंख ठेवून झोपल्याने माणसाला यश मिळते. हा उपाय करणाऱ्या व्यक्तीकडे अचानक पैसे येऊ लागतात आणि अशी व्यक्ती हळूहळू श्रीमंत होत जाते. मोरपंखांचा उपयोग केल्याने तुम्हाला कला आणि विद्येची प्राप्ती होते.


हेही वाचा :

krishna janmashtami 2023 : कृष्णाष्टमीच्या दिवशी ‘या’ 5 वस्तू अर्पण केल्यास श्रीकृष्ण होतील प्रसन्न

First Published on: September 5, 2023 12:43 PM
Exit mobile version