श्रावण महिन्याच्या कृष्ण पक्षातील अष्टमी तिथीला कृष्णाष्टमी साजरी केली जाते. पौराणिक कथेनुसार, यादिवशी मध्यरात्री श्रीकृष्णाचा जन्म झाला होता. श्री कृष्ण हा भगवान विष्णूंचा आठवा अवतार मानला जातो. यंदा कृष्णाष्टमी 6 आणि 7 सप्टेंबर रोजी साजरी केली जाणार आहे. यादिवशी श्रीकृष्णाची पूजा करताना त्यांना अत्यंत प्रिय असणाऱ्या 5 गोष्टी त्यांना अर्पण केल्यास श्री कृष्ण तुमच्यावर प्रसन्न होतील.
श्री कृष्णाला करा ‘या’ प्रिय वस्तू अर्पण
- पौराणिक मान्यतेनुसार, भगवान श्रीकृष्णांना लहानपणापासूनच लोणी आणि खडीसाखर खायला खूप आवडायची. त्यामुळे तुम्ही त्यांना कृष्णाष्टमीच्या दिवशी याचा नैवेद्य अर्पण करा.
- Advertisement -
- श्रीकृष्णांना दुसरी प्रिय असणारी गोष्ट म्हणजे मोरपंख श्रीकृष्ण त्यांच्या मुकुटावर मोरपंख धारण करतात. कृष्णाष्टमीच्या दिवशी त्यांना मोरपंख अर्पण केल्यास तुम्हाला नक्कीत त्यांचा आशिर्वाद प्राप्त होईल.
- श्रीकृष्णांना बासरी देखील अत्यंत प्रिय आहे. कृष्णाष्टमीच्या दिवशी कृष्ण मंदिरात बासरी अर्पण केल्यास कृष्ण भगवान तुमच्यावर खूश होतील.
- Advertisement -
- श्रीकृष्णांना गाय खूप प्रिय होती. त्यामुळे कृष्णाष्टमीच्या दिवशी गायीला हिरवा चारा खाऊ घाला किंवा श्रीकृष्णांची पूजा करताना गायीची मूर्ती देखील पूजेमध्ये ठेवून तिची पूजा करा.
- श्रीकृष्णांना धन्याची पंजीरी देखील अत्यंत प्रिय आहे. धन्याचा संबंध धनाशी आहे असं मानले जाते. त्यामुळे कृष्णाष्टमीच्या दिवशी धन्याची पंजीरी अर्पण केल्यास धनाची कमतरता भासत नाही.