krishna janmashtami 2023 : श्रीकृष्णाने 16,000 स्त्रियांशी विवाह का केला?

krishna janmashtami 2023 : श्रीकृष्णाने 16,000 स्त्रियांशी विवाह का केला?

श्रावण महिन्याच्या कृष्ण पक्षातील अष्टमी तिथीला कृष्णाष्टमी साजरी केली जाते. यंदा 6 आणि 7 सप्टेंबर रोजी कृष्णाष्टमी साजरी केली जाईल. पौराणिक कथेनुसार, या दिवशी मध्यरात्री श्रीकृष्णाचा जन्म झाला होता. श्री कृष्ण हा भगवान विष्णूंचा आठवा अवतार मानला जातो. श्री कृष्णांच्या विविध लिलांच्या अनेक कथा पौराणिक ग्रंथामध्ये लिहिल्या आहेत. यातील एक लीला नरकासुराच्या वधाची आहे. नरकासुर राक्षसामुळे भगवान श्रीकृष्णाला 16000 स्त्रियांशी लग्न करावे लागले.

श्री कृष्णाने केले होते 16,000 स्त्रियांशी लग्न

 

पौराणिक कथेनुसार, भगवान श्रीकृष्णाला 8 बायका होत्या. ज्यात रुक्मणी, जांबवंती, सत्यभामा, कालिंदी, मित्रबिंदा, सत्या, भद्रा आणि लक्ष्मणा अशी नावे होती. याशिवाय त्यांनी 16,000 मुलींशी लग्न केल्याचे कथांमध्ये सांगितले जाते. मात्र, कृष्णाने 16,000 मुलींशी लग्न केले होते, परंतु त्यांना पत्नी म्हणून स्वीकारले नाही.

या सर्व स्त्रियांशी लग्न करण्यामागे देखील एक कथा आहे. द्वापारयुगात नरकासुराची दहशत खूप वाढली होती. त्याच्या दहशतीमुळे सर्व लोकात हाहाकार माजला होता. आपली शक्ती हिरावून घेतली जाईल या भीतीने, स्वर्गाचा राजा इंद्राने कृष्णाकडे स्वर्गाचे रक्षण करण्याची विनंती केली.

तेव्हा श्रीकृष्णाने नरकासुराचा अंत जवळ आल्याचे आश्वासन दिले. दुसरीकडे अमरत्वाचे वरदान मिळवण्यासाठी नरकासुराने 16,000 मुलींना कैद करून कैदेत ठेवले होते. नंतर श्रीकृष्णाने नरकासुराच्या कैदेतून 16,000 मुलींची सुटका केली. मात्र, नरकासुराला कोणीही मारू शकत नाही असे वरदान होते. त्यावेळी सत्यभामेच्या मदतीने कृष्णाजीने नरकासुराचा वध केला. नरकासूराचा अंत झाला. त्यावेळी या सर्व स्त्रिया आपल्या घरी गेल्या मात्र, त्यांच्या घरच्यांनी त्यांना घरी घेतले नाही. समाजाच्या कलंकापासून वाचण्यासाठी 16,000 हजार मुलींनी श्रीकृष्णाला आपला पती म्हणून स्वीकारले. त्यावेळी श्रीकृष्णाने 16,000 रूपात प्रकट होऊन त्या मुलींचे लग्न केले.


हेही वाचा : krishna janmashtami 2023 : एकमेकांवर जीवापाड प्रेम असूनही ‘या’ कारणामुळे श्री कृष्ण-राधा यांचा विवाह झाला नाही

First Published on: September 6, 2023 12:08 PM
Exit mobile version