Friday, September 29, 2023
Eco friendly bappa Competition
घर मानिनी Religious krishna janmashtami 2023 : एकमेकांवर जीवापाड प्रेम असूनही 'या' कारणामुळे श्री कृष्ण-राधा...

krishna janmashtami 2023 : एकमेकांवर जीवापाड प्रेम असूनही ‘या’ कारणामुळे श्री कृष्ण-राधा यांचा विवाह झाला नाही

Subscribe

श्रावण महिन्याच्या कृष्ण पक्षातील अष्टमी तिथीला कृष्णाष्टमी साजरी केली जाते. यंदा 6 आणि 7 सप्टेंबर रोजी कृष्णाष्टमी साजरी केली जाईल. पौराणिक कथेनुसार, या दिवशी मध्यरात्री श्रीकृष्णाचा जन्म झाला होता. श्री कृष्ण हा भगवान विष्णूंचा आठवा अवतार मानला जातो. श्री कृष्णांच्या विविध लिलांच्या अनेक कथा पौराणिक ग्रंथामध्ये लिहिल्या आहेत.

- Advertisement -

श्री कृष्ण आणि राधा यांची प्रेमकथा सर्वांनाच ठाऊक आहे. जेव्हा जेव्हा प्रेमाचे उदाहरण दिले जाते तेव्हा श्रीकृष्ण-राधा यांचे नाव सर्वात आधी घेतले जाते. परंतु एकमेकांवर इतके जीवापाड प्रेम असणाऱ्या श्रीकृष्ण आणि राधाने एकमेकांसोबत लग्न का केले नाही? असा प्रश्न नेहमीच सर्वांना पडतो.

श्री कृष्णाने राधासोबत लग्न का केले नाही?

Krishna Radha love story | Facts About Radha Krishna Love Story

- Advertisement -

राधा आणि कृष्णाचे लग्न न होण्यामागे अनेक पौराणिक कथा सांगितल्या जातात. त्यातील एका पौराणिक ग्रंथानुसार, राधाने एकदा कृष्णाला विचारले की तो तिच्याशी लग्न का करू शकत नाही. त्यावेळी कृष्णाने तिला सांगितले की, आपला आत्मा एकच आहे त्यामुळे आपण स्वतःच्या आत्म्याशी लग्न कसे करावे.

दुसऱ्या कथेनुसार, राधाने स्वतःला कृष्णासाठी योग्य मानले नाही कारण ती गाय चरणारी होती. त्यामुळे ती भगवान श्रीकृष्णाशी लग्न न करण्याच्या निर्णयावर ठाम होती.

HD Radha Krishna Yugal Romantic Images (Radha Krishna Love)

तिसऱ्या कथेनुसार, भगवान श्री कृष्ण आणि राधा यांनी एकमेकांशी लग्न न करण्याचा निर्णय घेतला होता कारण त्यांचा विश्वास होता की प्रेम आणि विवाह एकमेकांपासून पूर्णपणे भिन्न आहेत. प्रेम हे शरीरावर नसून भक्ती आणि पवित्रतेने असते हे सिद्ध करण्यासाठी. एकमेकांशी लग्न न करून दोघांनी प्रेमाची परम भक्ती सर्व जगासमोर ठेवली.

Know Krishna Rukmini Story - Who is Rukmani {Rukmini}? - Indian Astrology

आणखी एका प्रचलित कथेनुसार, राधा हे देवी लक्ष्मीचेच एक रुप आहे तर कृष्णाची पत्नी देवी रुक्मिणी देखील देवी लक्ष्मीचेच रुप आहेत. रुक्मणी हे राधेचेच रूप होते.


हेही वाचा : krishna janmashtami 2023 : तुरुंगात झाला होता श्री कृष्णाचा जन्म; वाचा ही पौराणिक कथा

- Advertisment -

Manini