मोक्षदा एकादशीला बनतोय ‘हा’ अद्भुत संयोग

मोक्षदा एकादशीला बनतोय ‘हा’ अद्भुत संयोग

प्रत्येक महिन्यामध्ये दोन वेळा एकादशी येते. त्यातील एक एकादशी शुक्ल पक्षामध्ये असते. तर दुसरी एकादशी कृष्ण पक्षात असते. मार्गशीर्ष महिन्याच्या शुक्ल पक्षातील एकादशीला मोक्षदा एकादशी म्हटले जाते. धर्मशास्त्रानुसार, मोक्षदा एकादशीचे व्रत केल्याने मागील अनेक जन्मांचे पाप नष्ट होतात. तसेच या दिवशी पितरांचे तर्पण देखील केले जाते. यावर्षी शनिवार, 3 डिसेंबर रोजी मोक्षदा एकादशी असणार आहे.

धार्मिक मान्यतेनुसार, मार्गशीर्ष महिन्याच्या शुक्ल पक्षातील एकादशीच्या दिवशीच श्री कृष्णांनी अर्जुनाला गीतेचे ज्ञान दिले होते. त्यामुळे या एकादशीच्या दिवशी गीता जयंती देखील साजरी केली जाते. असं म्हणतात की, जे लोक या दिवशी पूर्वजांचे तर्पण करतात त्यांना पितृदोषापासून मुक्ति मिळते.

मोक्षदा एकादशीला बनतोय रवी योग
या वर्षी मोक्षदा एकादशीच्या दिवशी रवी योग देखील असणार आहे. ज्योतिष शास्त्रात याला अत्यंत शुभ मानले जाते.
या योगामध्ये पूजा-आराधना करणं शुभ मानलं जातं. शिवाय मोक्षदा एकादशीच्या दिवशी भद्रा आणि पंचक देखील असणार आहे. भद्रा काळ 3 डिसेंबर संध्याकाळी 5:33 पासून 4 डिसेंबर सकाळी 5:34 पर्यंत असेल. एकादशी तिथीची सुरुवात 3 डिसेंबर सकाळी 4: 39 वाजता होणार असून 4 डिसेंबर सकाळी 5: 34 वाजता एकादशी समाप्त होणार आहे.

मोक्षदा एकादशीला करु नका ‘या’ चूका


एकादशीचे व्रत हे संपूर्ण दिवसाचे असते. अनेकांना संपूर्ण दिवस व्रत करता येत नाही. अश्या व्यक्तींना व्रत नाही केले तरी चालेल, मात्र त्या दिवशी या गोष्टींचे सेवन करणे टाळा.

 


हेही वाचा :

मोक्षदा एकादशीचे काय आहे महत्त्व? जाणून घ्या तिथी आणि पूजाविधी

First Published on: December 2, 2022 4:16 PM
Exit mobile version