घरभक्तीमोक्षदा एकादशीचे काय आहे महत्त्व? जाणून घ्या तिथी आणि पूजाविधी

मोक्षदा एकादशीचे काय आहे महत्त्व? जाणून घ्या तिथी आणि पूजाविधी

Subscribe

प्रत्येक महिन्यामध्ये दोन वेळा एकादशी येते. त्यातील एक एकादशी शुक्ल पक्षामध्ये असते. तर दुसरी एकादशी कृष्ण पक्षात असते. मार्गशीर्ष महिन्याच्या शुक्ल पक्षातील एकादशीला मोक्षदा एकादशी म्हटले जाते. धर्मशास्त्रानुसार, मोक्षदा एकादशीचे व्रत केल्याने मागील अनेक जन्मांचे पाप नष्ट होतात. तसेच या दिवशी पितरांचे तर्पण देखील केले जाते.

कधी आहे मोक्षदा एकादशी
हिंदू पंचागानुसार, मार्गशीर्ष महिन्याच्या शुक्ल पक्षातील एकादशी तिथीची सुरुवात 3 डिसेंबर सकाळी 4: 39 वाजता होणार असून 4 डिसेंबर सकाळी 5: 34 वाजता एकादशी समाप्त होणार आहे. त्यामुळे मोक्षदा एकादशीचे व्रत 3 डिसेंबर रोजी केले जाईल.

- Advertisement -

मोक्षदा एकादशीचे काय आहे महत्व


धार्मिक मान्यतेनुसार, मार्गशीर्ष महिन्याच्या शुक्ल पक्षातील एकादशीच्या दिवशीच श्री कृष्णांनी अर्जुनाला गीतेचा संदेश दिला होता. त्यामुळे या एकादशीच्या दिवशी गीता जयंती देखील साजरी केली जाते. असं म्हणतात की, जे लोक या दिवशी पूर्वजांचे तर्पण करतात त्यांना पितृदोषापासून मुक्ति मिळते.

- Advertisement -

मोक्षदा एकादशीची अशा प्रकारे करा पूजा

  • मोक्षदा एकादशीच्या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करावे, स्वच्छ कपडे परिधान करून सूर्य देवाला अर्घ्यअर्पण करावे.
  • घरातील देवी-देवतांची पूजा करावी, तसेच भगवान विष्णूंना पिवळी फुलं, चंदन, तुळस अर्पण करावी. धूप-दीप लावून त्यांची आरती करावी.
  • पूजा पूर्ण झाल्यावर ‘ॐ नमो भगवते वासुदेवाय’ या मंत्राचा जप करा, तसेच विष्णूच्या स्तोत्रांचे पठण करा.
    भगवान विष्णूंना नैवेद्य अर्पण करा.

हेही वाचा :

तुळशी पूजेदरम्यान करा ‘या’ अद्भुत स्तोत्राचे पठण; देवी लक्ष्मी देखील होतील प्रसन्न

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -