Nag panchami 2023 : अशा प्रकारे झाली नागांची उत्पत्ती; ‘हे’ आहेत नागांचे माता-पिता

Nag panchami 2023 : अशा प्रकारे झाली नागांची उत्पत्ती; ‘हे’ आहेत नागांचे माता-पिता

आज श्रावण महिन्याच्या शुक्ल पक्षातील पंचमी तिथी असून संपूर्ण देशभरात आज नागपंचमी साजरी केली जात आहे. हिंदू धर्मात नागपंचमीचं विशेष महत्व सांगण्यात आलं आहे. पौराणिक काळापासून नाग देवतेला पूजनीय मानले जाते. आज आम्ही तुम्हाला नागांची उत्पती कशी झाली हे सांगणार आहोत.

‘हे’ आहेत नागांचे आई-वडील

हिंदू पुराणानुसार, सर्व नागांची उत्पत्ती कश्यप ऋषी आणि त्यांची पत्नी कद्रूच्या पोटी झाली. कद्रू ही प्रजापती दक्ष यांची पुत्री होती. एकदा महर्षी खुश झाले आणि त्यांनी आपल्या प्रिय पत्नीला वर मागण्यास सांगितला. जेव्हा कद्रूने महर्षींना 1000 पराक्रमी नागांची आई होण्यासाठी वरदान मागितले. तेव्हा कद्रूने हजारो नागांना जन्म दिला होता. ज्यातील प्रमुख नाग अनंत(शेष), वासुकी, तक्षक, कर्कोटक, पद्म, महापद्म, शंख, पिंगला आणि कुलिक होते. या पाच नागांमध्ये अनंत नागाला श्री विष्णूंची सेवा करण्याचे भाग्य लाभले होते. तर महादेवांच्या गळ्यात विराजमान होण्याचे भाग्य वासुकी नागाला मिळाले होते.वासुकी नागाला महादेवांचा अत्यंत प्रिय भक्त मानले जाते.

नागांचे प्रकार

शास्त्रामध्ये सात्त्विक, राजसिक आणि तामसिक या तीन प्रकारच्या नागांचे वर्ण करण्यात आले आहे. या तीन प्रकारांनुसार नागांचे वर्णन आणि स्वभाव असतो.

राजसिक नाग पृथ्वीवर वास करतात. नागयोनीमध्ये जन्म मिळाल्यामुळे या नागांचे आचरण सर्वसामान्य नागांप्रमाणे असते. ते काळे, निळसर, तपकिरी रंगांचे असतात.

 

तामसिक नाग प्रामुख्याने काळ्या रंगाचे असून ते पाताळातील नागलोकात वास करतात. वाईट शक्ती या नागांचा सूक्ष्म युद्धामध्ये शत्रूवर विषप्रयोग करण्यासाठी शस्त्राप्रमाणे वापर करतात. पाताळातील नाग हे पृथ्वीवर नागांपेक्षा अनेक पटीने सामर्थ्यवान आणि विषारी असतात.

सात्विक नाग दैवी असल्यामुळे ते नागलोकात वास करतात. त्यांचा रंग पिवळसर असतो आणि त्यांच्या मस्तकावर नागमणी देखील असतो. सात्त्विक नाग पाताळातील नागांच्या तुलनेत अनेक पटीने सामर्थ्यवान असतात. शास्त्रानुसार, सात्त्विक नागांना विविध देवतांनी धारण केले आहे. महादेवांच्या गळ्यात असलेला वासुकी देखील सात्विक नाग आहे. तर गणपतीच्या पोटाला वेटोळे घातलेला पिवळा नाग पद्मनाभ देखील सात्विक आहे. तसेच श्रीविष्णूंचा शेषनाग देखील सात्त्विक नाग आहे.


हेही वाचा :

Nag panchami 2023 : यंदा नागपंचमी आणि श्रावण सोमवार एकाच दिवशी! शुभ योगात म्हणा ‘हा’ मंत्र

First Published on: August 21, 2023 1:41 PM
Exit mobile version