दगडूशेठ हलवाई गणपतीला ११ हजार शहाळ्यांचा महानैवेद्य…

दगडूशेठ हलवाई गणपतीला ११ हजार शहाळ्यांचा महानैवेद्य…

महाराष्ट्रात सिद्धी विनायक मंदिराप्रमाणेच पुण्यातील दगडूशेठ हलवाई मंदिर ही जगभरात प्रसिद्ध आहे. पुष्टीपती विनायक निमित्त गणपतीला ११ हजार शहाळ्यांच महानैवेद्य दाखवण्यात आला आहे. तर मंदिराची ट्रस्ट आणि सुवर्णयुग तरुण मंडळातर्फे शहाळे मोहोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते.

या निमित्त मंदिरात पूजा, अभिषेक झाला. तसेच वादनाचा सुद्धा कार्यक्रम पार पडला. खरंतर पुष्टीपती विनायक अवताराचा संदर्भ हा श्री गणेश पुराण आणि मुद्गल पुराणात आहे.

वैशाख पौर्णिमेच्या पवित्र दिवशी श्री गणेश पुष्टिपती विनायक हा अवतार झाल्याचे सांगितले जाते. वैखाश पौर्णिमेला भारतीय संस्कृतीत फार महत्व आहे.

या मंदिराबद्दल असे सांगितले जाते की, लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांनी याच मंदिरापासून गणेश उत्सवाची सुरुवाच केली आहे. तेव्हापासून प्रत्येक वर्षी येथे सुद्धा मोठ्या उत्साहात गणेशोत्सव साजरा केला जातो.


हेही वाचा- प्राचीनकाळातील ‘हे’ दिव्य पुरुष आजही आहेत अस्तित्वात

First Published on: May 5, 2023 1:33 PM
Exit mobile version