Ram Navami 2024 : कधी आहे रामनवमी? जाणून घ्या शुभ मुहूर्त आणि तिथी

Ram Navami 2024 : कधी आहे रामनवमी? जाणून घ्या शुभ मुहूर्त आणि तिथी

चैत्र नवरात्रीची सुरुवात 9 एप्रिलपासून सुरु झाली असून 17 एप्रिल रोजी नवरात्र समाप्त होणार आहे. हिंदू धर्मात चैत्र नवरात्री विशेष महत्त्वपूर्ण आहे. नवरात्रीच्या नवमीला म्हणजेच चैत्र नवमीला संपूर्ण भारतात श्री प्रभू रामचंद्रांच्या जन्माचा उत्सव साजरा केला जातो. यंदा 17 एप्रिल रोजी रामनवमी साजरी केली जाणार आहे.

धार्मिक मान्यतेनुसार, चैत्र महिन्याच्या शुक्ल पक्षातील नवमी तिथीला भगवान श्रीविष्णूंनी, प्रभू रामचंद्रांच्या रुपात पृथ्वीवर अवतार घेतला होता. त्यांच्याच जन्माचा उत्सव म्हणून हिंदू धर्मात रामनवमी साजरी केली जाते.

रामनवमी तिथी

पंचांगानुसार, राम नवमीची तिथी 16 एप्रिल रोजी दुपारी 01:23 पासून सुरू होणार असून 17 एप्रिल दुपारी 03:15 पर्यंत समाप्त होईल. उदयतिथीनुसार, 17 एप्रिल रोजी रामनवमी साजरी केली जाईल.

रामनवमीचा शुभ मुहूर्त

17 एप्रिल रोजी रामनवमीचा शुभ मुहूर्त सकाळी 11:03 पासून ते दुपारी 01:36 पर्यंत असेल.

अशी करा पूजा


हेही वाचा :

Chaitra Navratri 2024 : नवरात्रीच्या पवित्र दिवसात या गोष्टी टाळा

First Published on: April 15, 2024 11:55 AM
Exit mobile version