Tuesday, April 30, 2024
घरमानिनीReligiousChaitra Navratri 2024 : नवरात्रीच्या पवित्र दिवसात या गोष्टी टाळा

Chaitra Navratri 2024 : नवरात्रीच्या पवित्र दिवसात या गोष्टी टाळा

Subscribe

चैत्र आणि अश्विन नवरात्रीला भारतात मोठ्या प्रमाणात साजरी केले जाते.  चैत्र नवरात्र 9 एप्रिल म्हणजेच आजपासून सुरू होत असून 17 एप्रिलपर्यंत समाप्त होणार आहे. नवरात्रीच्या पहिल्या दिवशी घटस्थापना केली जाते. नवरात्रीमध्ये देवीची उपासना केल्याने देवी प्रसन्न होते. दुर्गा देवी ही सुख, समृद्धी, शक्ती आणि धनाची देवी असल्याचे मानले जाते. जे भाविक श्रद्धेने देवीची पूजा करतात त्यांवर देवीची अखंड कृपा असते. तसेच शास्त्रानुसार या काळात काही गोष्टी करण्यास वर्ज्य मानल्या जातात.

नवरात्रीच्या काळात चुकूनही करू नका ‘या’ चूका

- Advertisement -
  • घर बंद ठेऊ नका

नवरात्रीच्या दिवसात तुमच्या घरामध्ये घटस्थापना झाली असेल तर, या काळात तुम्ही तुमचे घर बंद ठेऊ नका. घरामध्ये सतत कोणीतरी असायला हवं. तसेच या काळात दिवसाचे झोपू नका.

  • मुलींना ठेवा खूश

हिंदू धर्मामध्ये मुलींना देवीचे रूप मानले जाते. या दरम्यान चुकूनही मुलींचे मन दुखवू नका. शास्त्रामध्ये मुलींचा अपमान केल्याने देवी रागावतात. फक्त मुलीच नाही तर नेहमीच सर्व स्त्रियांचा आदर करावा.

- Advertisement -
  • वादविवादापासून दूर राहा

नवरात्रीमध्ये मन शांत आणि स्वच्छ ठेवायला हवं. या काळात कोणावरही चिडू नये. घरामध्ये कलह करू नये. नाहीतर अशा ठिकाणी देवी लक्ष्मी वास करत नाही.

  • कांदा, लसूण आणि मासांहार करू नये

नवरात्रीच्या काळात कांदा, लसूण आणि मासांहार करू नये. नवरात्रीत यांचे सेवन करणं अपवित्र मानले जाते.

  • केस आणि नखे कापू नये

नवरात्रीच्या काळात स्त्री आणि पुरुषांनी केस किंवा नखे कापू नये. कारण शास्त्रानुसार हे अशुभ मानले जाते.

 


हेही वाचा : 

Chaitra Navratri 2024 : या वाहनावरुन होणार देवीचे आगमन; वर्षभरात घडतील विचित्र घटना

- Advertisment -

Manini