तुळशी पूजेदरम्यान करा ‘या’ स्तोत्राचे पठण; लक्ष्मी होईल प्रसन्न

तुळशी पूजेदरम्यान करा ‘या’ स्तोत्राचे पठण; लक्ष्मी होईल प्रसन्न

हिंदू धर्मात तुळशीच्या रोपट्याचे खूप महत्व आहे. तुळशीमध्ये देवी लक्ष्मीचा वास असतो. असं म्हणतात की, नियमीत तुळशीच्या रोपट्याची पूजा केल्याने घरामध्ये सुख-समृद्धीचा वास होतो. प्रत्येक घरामध्ये तुळशीचे रोपटे असते. असं म्हणतात ज्या घरातील तुळस नेहमी हिरवीगार असते. तिथे सकारात्मक ऊर्जेचा संचार असतो. तुळशीची पूजा केल्याने देवी लक्ष्मीसोबतच नारायणांचा देखील आर्शिवाद प्राप्त होतो.

ज्योतिष शास्त्रानुसार, घरामध्ये दररोज तुळशीच्या पूजेसोबतच तुळशीच्या मंत्राचा किंवा तुळशी स्तोत्राचे पठण करणं देखील शुभ फळ लवकर प्राप्क होतील. असं म्हणतात, ज्या कुटुंबामध्ये तुळशीची नियमीत पूजा त्या ठिकाणी कधीही कोणाचा अकाल मृत्यू होत नाही.

तुळशी मंत्र

ॐ तुलसीदेव्यै च विद्महे, विष्णुप्रियायै च धीमहि, तन्नो वृन्दा प्रचोदयात् ।।
असं म्हणतात की तुळशीच्या या मंत्राचा जप केल्याने सर्व मनोकामना पूर्ण होतात.

तुलसी स्तोत्राचे करा पठण

यतो ब्रह्मादयो देवाः सृष्टिस्थित्यन्तकारिणः ॥1॥
नमस्तुलसि कल्याणि नमो विष्णुप्रिये शुभे।
नमो मोक्षप्रदे देवि नमः सम्पत्प्रदायिके ॥2॥
तुलसी पातु मां नित्यं सर्वापद्भ्योऽपि सर्वदा।
कीर्तितापि स्मृता वापि पवित्रयति मानवम् ॥3॥
नमामि शिरसा देवीं तुलसीं विलसत्तनुम्।
यां दृष्ट्वा पापिनो मर्त्या मुच्यन्ते सर्वकिल्बिषात् ॥4॥
तुलस्या रक्षितं सर्वं जगदेतच्चराचरम्।
या विनिहन्ति पापानि दृष्ट्वा वा पापिभिर्नरैः ॥5॥

नमस्तुलस्यतितरां यस्यै बद्ध्वाजलिं कलौ।
कलयन्ति सुखं सर्वं स्त्रियो वैश्यास्तथाऽपरे ॥6॥
तुलस्या नापरं किञ्चिद् दैवतं जगतीतले।
यथा पवित्रितो लोको विष्णुसङ्गेन वैष्णवः ॥7॥
तुलस्याः पल्लवं विष्णोः शिरस्यारोपितं कलौ।
आरोपयति सर्वाणि श्रेयांसि वरमस्तके ॥8॥
तुलस्यां सकला देवा वसन्ति सततं यतः।
अतस्तामर्चयेल्लोके सर्वान् देवान् समर्चयन् ॥9॥
नमस्तुलसि सर्वज्ञे पुरुषोत्तमवल्लभे।
पाहि मां सर्वपापेभ्यः सर्वसम्पत्प्रदायिके ॥10॥
इति स्तोत्रं पुरा गीतं पुण्डरीकेण धीमता।
विष्णुमर्चयता नित्यं शोभनैस्तुलसीदलैः ॥11॥
तुलसी श्रीर्महालक्ष्मीर्विद्याविद्या यशस्विनी।
धर्म्या धर्नानना देवी देवीदेवमनःप्रिया ॥12॥
लक्ष्मीप्रियसखी देवी द्यौर्भूमिरचला चला।
षोडशैतानि नामानि तुलस्याः कीर्तयन्नरः ॥13॥
लभते सुतरां भक्तिमन्ते विष्णुपदं लभेत्।
तुलसी भूर्महालक्ष्मीः पद्मिनी श्रीर्हरिप्रिया ॥14॥
तुलसि श्रीसखि शुभे पापहारिणि पुण्यदे ।
नमस्ते नारदनुते नारायणमनःप्रिये ॥15॥
इति श्रीपुण्डरीककृतं तुलसीस्तोत्रं सम्पूर्णम् ॥

 

 


हेही वाचा :

Vastu Tips : पूजेत तुपाचा की तेलाचा दिवा लावावा?

First Published on: December 19, 2023 1:00 PM
Exit mobile version