Saturday, May 18, 2024
घरमानिनीRelationshipवाणी ज्ञानेश्वरांंची

वाणी ज्ञानेश्वरांंची

Subscribe

नमो विशदबोधविद्गदा । विद्यारविंदप्रबोधा । पराप्रमेयप्रमदा । विलासिया ॥
(हे गुरो,) निर्मल अशा ब्रह्मज्ञानाचा बोध करण्यात चतुर, विद्यारूप कमळाला विकसित करणारा आणि परारूप ज्ञानवाणीचा जो प्रमेय म्हणजे अर्थ हीच कोणी एक प्रमदा म्हणजे तरुण स्त्री हिशी विलास करणारा असा जो तू, त्या तुला नमस्कार असो!
नमो संसारतमसूर्या । अपरिमितापरमवीर्या । तरुणतरतूर्या । लालनलीला ॥
संसाररूप अंधकाराच्या अज्ञानाचा नाश करण्यात सूर्याप्रमाणे अतिसामर्थ्यवान व तारुण्यभरात असणार्‍या तूर्यावस्थेशी विलास करणारा असा जो तू त्या तुला नमस्कार असो!
नमो जगदखिलपालना । मंगळमणिनिधाना । सज्जनवनचंदना । आराध्यलिंगा ॥
सर्व जगाचे पालन करणारा, कल्याणरूप रत्नांचा ठेवा, सज्जनरूप वनात चंदनासारखा श्रेष्ठ आणि ज्याचे स्वरूप आराधन करण्यास योग्य, असा जो तू त्या तुला नमस्कार असो!
नमो चतुरचित्तचकोरचंद्रा । आत्मानुभवनरेंद्रा । श्रुतिसारसमुद्रा । मन्मथमन्मथा ॥
भक्तांच्या चित्तरूप चकोर पक्ष्यास चंद्रासारखा, ब्रह्मानंदरूप अनुभवाचा राजा, श्रुतीच्या ज्ञानाचा समुद्र आणि मदनाचा नाश करणारा असा जो तू त्या तुला नमस्कार असो!
नमो सुभावभजनभाजना । भवेभकुंभभंजना । विश्वोद्भवभुवना । श्रीगुरुराया ॥
भावयुक्त ज्ञान्याच्या भजनास पात्र, संसारूप हत्तीचे गंडस्थळ फोडणारा व जगाच्या उत्पत्तीचे स्थान अशा हे श्रीगुरुराया, तुजप्रत नमस्कार असो!
तुमचा अनुग्रहो गणेशु । जैं दे आपुला सौरसु । तैं सारस्वतीं प्रवेशु । बाळकाही आथी ॥
तुमच्या कृपारूप गणेशाचा जेव्हा प्रसाद होतो, तेव्हा लहान मुलालाही शास्त्राच्या गुह्य सिद्धांताचे ज्ञान होते.
जी दैविकीं उदार वाचा । जैं उद्देशु दे नाभिकाराचा । तैं नवरससुधाब्धीचा । थावो लाभे ॥
गुरूच्या उदार वाचेने जेव्हा अभयवचन मिळते, तेव्हा नऊ रस ही नऊ खंडे यांचा थांग लागतो.
जी आपुलिया स्नेहाची वागेश्वरी । जरी मुकेयातें अंगिकारी । तो वाचस्पतीशीं करी । प्रबंधुहोडा ॥
जेव्हा आपली प्रेमरूप सरस्वती मुक्याचाही अंगीकार करते, तेव्हा ग्रंथ करण्याची तो बृहस्पतीशीसुद्धा पैज मारू शकतो.

- Advertisment -

Manini