प्राचीनकाळातील ‘हे’ दिव्य पुरुष आजही आहेत अस्तित्वात

प्राचीनकाळातील ‘हे’ दिव्य पुरुष आजही आहेत अस्तित्वात

पौराणिक कथेनुसार, अनेक महापुरुषांना अमर होण्याचे वरदान प्राप्त झाले. असं म्हटलं जातं की, ते महापुरुष आज कलियुगातही जीवंत आहेत. यात भगवान हनुमानांचा देखील समावेश आहे. यात हनुमानांव्यतिरिक्त अनेक दिव्य पुरुषांचा समावेश आहे.

असं म्हटलं जात की, भगवान हनुमान आजही अस्तित्वात आहेत आणि पृथ्वीवरील लोकांमध्ये उपस्थित आहेत. कलियुगातही अनेक लोक भगवान हनुमानांची पूजा-आराधना करतात.

द्रोणाचार्यांचे पुत्र अश्वथामा देखील आजही कलियुगात जिवंत असल्याचं म्हटलं जातं. अश्वथामाला महादेवांनी अमर होण्याचे वरदान दिले होते. मात्र, त्यानंतर डोक्यावर लागलेली जखम घेऊन सृष्टीच्या अंतापर्यंत पृथ्वीवर भटकत राहण्याचा शाप त्याला श्री कृष्णांनी शाप दिला होता.

महाभारताच्या काळातील एक दिव्य महापुरुष गुरु कृपाचार्य होते. त्यांना कौरवांचे आणि पांडवांचे गुरु मानले होते. तपश्चर्येच्या जोरावर त्यांना अमरत्व प्राप्त केले होते.

रावणाचा भाऊ विभीषणाला देखील अमर म्हटलं जातं. रामायण काळात विभीषणाने आपला भाऊ रावणाची साथ न देता श्री रामांची मदत केली होती.

श्री परशुराम हे देखील भगवान विष्णूच्या अवतारांपैकी एक आहेत. असे मानले जाते की ते आजही कलियुगात जिवंत आहेत.

मार्कंडेय ऋषींनाही अमरत्वाचे वरदान लाभले होते. मार्कंडेय ऋषी जन्मापासूनच अल्पायुषी होते. अशा स्थितीत त्यांनी महामृत्युंजय मंत्राची रचना केली आणि तपश्चर्येद्वारे भगवान शंकरांना प्रसन्न करून चिरंजीवी होण्याचे वरदान प्राप्त केले.


हेही वाचा : 

Mohini Ekadashi 2023 : आज श्री विष्णूंनी का घेतला होता मोहिनी अवतार; वाचा संपूर्ण कथा

First Published on: May 2, 2023 12:16 PM
Exit mobile version