‘या’ राशीच्या व्यक्ती जगतात लग्जरी लाईफस्टाईल, तुमची रास कोणती?

लक्ष्मीदेवीला धनदेवता म्हटले जाते. जीवनात सुख समृद्धी आणि वैभव मिळावे यासाठी सगळेजणचं लक्ष्मीदेवीची पूजा अर्चा करतात. पण अशा काही राशी असतात ज्यांच्यावर लक्ष्मीदेवतेची कायम कृपा असते.

वृषभ- वृषभ राशीवाल्यांवर लक्ष्मी मातेची विशेष कृपा असते. ज्योतिष शास्त्रानुसार वृषभ राशीचा स्वामी शुक्र आहे. शुक्रामुळे या राशीवाल्या व्यक्तींना फारसे कष्ट न करता लग्जरी लाईफ प्राप्त होते.

सिंह-ज्योतिष शास्त्रामध्ये सिंह रास ही राशींमधली पाचवी रास आहे. या राशीता स्वामी सूर्य आहे. सुर्याला ग्रहांचा राजा मानले जाते. यामुळे या राशीच्या व्यक्ती प्रभावशाली असतात. बंधनात राहणे यांना पसंत नसते. सिंहच्या व्यक्ती स्वत:च्या मतांवर जगतात. या राशीचे ग्रह फलदायी असतात तेव्हा सर्व सुख यांच्या पायाशी लोळण घेतात.

धनु-धनु राशीच्या व्यक्ती या गंभीर स्वभावाच्या असतात. नावीन्याची यांना सतत ओढ असते. कुठलही कार्य धनु रास विचारपूर्वक करते. सुखी समृद्ध आयुष्य यांना प्राप्त होते.

 

First Published on: January 24, 2022 2:05 PM
Exit mobile version