भारतातील ही नदी आहे शापित; पाण्याला स्पर्श करण्यासही घाबरतात लोक

भारतातील ही नदी आहे शापित; पाण्याला स्पर्श करण्यासही घाबरतात लोक

नद्या निसर्गातील एक अविभाज्य भाग आहेत. नदीतील पाणी फक्त मनुष्यांसाठीच नाहीतर संपूर्ण सजीव सृष्टीसाठी वरदान आहे. भारतात नद्यांना देवी स्वरुप मानले जाते आणि त्यांची पूजा देखील केली जाते. भारतातील विविध सण-समारंभाला नदीमध्ये स्नान करणं देखील शुभ मानलं जातं. येथील गंगा, यमुना, गोदावरी, कावेरी, नर्मदा, तापी, कृष्णा, सिंधू यांसारख्या 400 प्रमुख नद्या असून इतर काही उपनद्या आहेत. मात्र, भारतात एक नदी अशी देखील आहे जिला शापित मानलं जातं.

या नदीबाबत अनेकांच्या मनात भीती आहे. या नदीमधील पाण्याला कधीही कोणी स्पर्श देखील अशुभ मानलं जातं. या शापित नदीचं नाव कर्मनाशा नदी असून ही उत्तर प्रदेशात आहे.

उत्तर प्रदेशातील बिहारमध्ये असलेल्या या कर्मनाशा नदीला कोणाही स्पर्श देखील करत नाही. कारण नदीच्या पाण्याला स्पर्श केल्याने कामाचा नाश होतो असं मानलं जातं. त्यामुळे तिच्या पाण्याला कधीही कोणी स्पर्श करत नाही. बिहारमध्ये असेलेल्या या नदीचा अर्धा भाग यूपीमध्ये आहे. ही पुढे सोनभद्र, चंदौली, वाराणसी आणि गाजीपुरमधून गंगा नदीला जाऊन मिळते.

कर्मनाशा नदीची पौराणिक कथा

कर्मनाशा नदी शापित असण्यामागे एक पौराणिक कथा सांगितली जाते. त्यानुसार राजा हरिशचंद्राचे पिता सत्यव्रतने एकदा आपले गुरु वशिष्ठ यांच्याकडे स्वर्गात जाण्याची इच्छा व्यक्त केली. परंतु गुरु वशिष्ठांनी त्यास नकार दिला. त्यानंतर सत्यव्रत राजाने गुरु विश्वामित्रांकडे आग्रह केला. वशिष्ठ आणि विश्वामित्रांची शत्रूता असल्याने विश्वामित्रांनी आपल्या तपाच्या जोरावर सत्यव्रत राजाला सशरीर स्वर्गात पाठवलं. हे पाहून इंद्रदेव संतापले आणि राजाचं उलटं लटकावून पुन्हा पृथ्वीवर पाठवले. यावेळी विश्वामित्रांनी राजाला स्वर्ग आणि पृथ्वीच्या मध्यावर थांबून ठेवले आणि देवतांसोबत युद्ध केले. यावेळी राजा उलटा लटकत असल्याने त्याच्या तोंडातील लाळ जमीनीवर गळू लागली. त्या लाळेपासूनच कर्मनाशा नदीचा उगम झाला. तसेच गुरु वशिष्ठांनी त्यावेळी राजाच्या कृत्यामुळे चांडाळ होण्याचा शाप दिला. यांच शापामुळे आणि लाळेमुळे या नदीला शापित मानले जाते.


हेही वाचा :

कमी मेहनत, जास्त पैसा कमावणारे ‘या’ आहेत 4 भाग्यशाली राशी

First Published on: July 19, 2023 5:00 PM
Exit mobile version