‘या’ राशीवाल्यांसाठी येणारे ११ दिवस फलदायी, होणार सूर्यदेवाची कृपा

सूर्यदेवाला सर्व ग्रहांचा राजा असे म्हटले जाते. सध्या सूर्य मकर राशीत असून १३ फेब्रुवारीपर्यंत तो मकर राशीत राहणार आहे. याकाळात सूर्यदेवाची काही राशींवर विशेष कृपा होणार आहे. ज्योतिष शास्त्रात सूर्य देवाला विशेष स्थान असून आत्मा,पिता, मान सन्मान, सफलता आणि प्रगतीबरोबरच सरकारी आणि गैरसरकारी क्षेत्रात उच्च सेवांचा कारक म्हणून मानले जाते.

मेष- शत्रुंवर विजय मिळवाल. कार्यस्थळावर मान सन्मान मिळेल. आर्थिक कोंडी सुटेल. तब्येतीत सुधारणा होईल. वैवाहीक जीवनात सुखद घटना घडतील. धनलाभ होईल.

मिथुन- आनंदाची बातमी कळेल. कौटुंबिक सोहळ्यात सहभागी व्हाल. नोकरीच्या शोधात असणाऱ्यांना अपेक्षित नोकरी मिळेल. दाम्पत्य जीवनात आनंदाच्या घटना घडतील. आत्मविश्वास वाढेल. धनलाभ होईल. कर्ज फिटतील.

कर्क- राशीसाठी पुढचे दिवस आनंदाचे असतील. पैशांची कामे होतील.समाजात मान-सन्मान वाढेल. पद-प्रतिष्ठा उंचावेल. गुंतवणुकीचा मार्गे सापडेल. आर्थिक व्यवहार पार पडतील.

सिंह- सिंह राशीसाठी येणारा काळ वरदाना समान आहे. समाजात मानसन्मान वाढेल. कार्यक्षेत्रात लाभ होईल. सूर्य गोचर कालात असल्याने सिंह राशीला कामात यश मिळेल. पैशांचे स्त्रोत वाढतील. व्यापारात वाढ होईल.

वृश्चिक-नोकरी बदलण्याचा विचार कराल. व्यापारात यश मिळेल. रखडलेली कामे होतील. नोकरी व्यापारात बढती मिळेल. साथीदारासोबत वेळ घालवाल. मदतीसाठी अनेकजम पुढे येतील.

First Published on: February 2, 2022 5:28 PM
Exit mobile version