उत्पत्ती एकादशीला असतील ‘हे’ 4 अद्भुत संयोग; अशा प्रकारे करा पूजा

उत्पत्ती एकादशीला असतील ‘हे’ 4 अद्भुत संयोग; अशा प्रकारे करा पूजा

प्रत्येक महिन्यामध्ये दोन वेळा एकादशी येते. त्यातील एक एकादशी शुक्ल पक्षामध्ये असते. तर दुसरी एकादशी कृष्ण पक्षात असते. कार्तिक महिन्याच्या कृष्ण पक्षातील एकादशीला उत्पत्ति एकादशी म्हटले जाते. धर्मशास्त्रानुसार, याचं दिवशी भगवान विष्णूंकडून देवी एकादशीची उत्पत्ति करण्यात आली. मान्यतेनुसार, उत्पत्ति एकादशीचे व्रत केल्याने मागील अनेक जन्मांचे पाप नष्ट होतात. या वर्षीची उत्पत्ति एकादशी खूप खास असल्याचं म्हटलं जात आहे. कारण, या दिवशी अनेक शुभ संयोग बनत आहेत. या वर्षी उत्पत्ति एकादशी रविवार, 20 नोव्हेंबर 2022 रोजी असणार आहे.

उत्पत्ती एकादशीला असणार शुभ संयोग
2022 मध्ये उत्पत्ती एकादशीला 4 शुभ संयोग असणार आहेत. यामध्ये अमृत सिद्धि, सर्वार्थ सिद्धि, प्रीति योग आणि आयुष्मान योग असतील. एकाच दिवशी हे 4 शुभ संयोग असल्यामुळे या एकादशीचे दुप्पट फळ मिळणार आहे.

उत्पत्ती एकादशी शनिवार, 19 नोव्हेंबर रोजी सकाळी 10:29 पासून होणार असून 20 नोव्हेंबर रोजी सकाळी 10:41 पर्यंत असणार आहे. यावेळी हे 4 शुभ योग देखील राहतील.

उत्पत्ती एकादशीची अशा प्रकारे करा पूजा

उत्पत्ती एकादशीला करु नका ‘या’ चूका
एकादशीचे व्रत हे संपूर्ण दिवसाचे असते. अनेकांना संपूर्ण दिवस व्रत करता येत नाही. अश्या व्यक्तींना व्रत नाही केले तरी चालेल, मात्र त्या दिवशी या गोष्टींचे सेवन करणे टाळा.

 

First Published on: November 17, 2022 4:24 PM
Exit mobile version