वास्तुशास्त्र आणि आजार यांचा काय आहे संबंध?

वास्तुशास्त्र आणि आजार यांचा काय आहे संबंध?

वास्तुशास्त्रानुसार पृथ्वीतलावर जशी सकारात्मक उर्जा असते तशीच नकारात्मक उर्जाही असते. हीच उर्जा आपले वास्तव्य जिथे असते तिथे आणि आपण काम करतो तिथेही असते. यामुळे आपल्या आयुष्यात घडणाऱ्या बऱ्या वाईट घटनांचा या उर्जांशी थेट संबंध असतो.

जर तुमच्या घऱासमोर , प्रवेशद्वारासमोर खड्डा, कचरा किंवा घाणीचे ढिगारे असतील तर त्याचा तुमच्या आरोग्यावर वाईट परिणाम होतो. मानसिक ताण वाढतो. घरात आजारपण वाढते.

घरात जुन्या वस्तूंचा साठा करु नये. अनावश्यक वस्तू फेकून द्याव्यात. यामुळे नकारात्मक उर्जा तयार होते. सकारात्मक उर्जा कमी पडते.

बेडरुममध्ये कधीही देवाचे फोटो, संताचे फोटो ठेवू नयेत.

घरासमोर विहीर, गटार, नाला असू नये. यामुळे आजारपण बळावतं.

घरावर कोणत्याही झाडाची सावली पडणे अशुभ मानले जाते. घरासमोर झाड असल्यास बाल दोष निर्माण होतो.

बेडरुममध्ये धातू सदृश वस्तू ठेवू नयेत. पती पत्नीमध्ये वाद निर्माण होतात.

 

 

First Published on: December 28, 2021 4:25 PM
Exit mobile version