Wednesday, May 15, 2024
घरमानिनीReligious'या' बोटामध्ये सोन्याची अंगठी घातल्याने वाढते दारिद्र्य

‘या’ बोटामध्ये सोन्याची अंगठी घातल्याने वाढते दारिद्र्य

Subscribe

अनेक व्यक्तींना बोटांमध्ये अंगठी घालयची आवड असते. यातील काहीजण अंगठी फॅशन म्हणून घालतात तर काहीजण अंगठी आपल्या राशीनुसार घालतात. मात्र, अनेकदा काही गोष्टी ठाऊक नसल्यामुळे लोक कोणत्याही धातूची अंगठी कोणत्याही बोटामध्ये घालतात. ज्याचा अशुभ प्रभाव त्यांना भोगावा लागतो. ज्योतिष शास्त्रानुसार हाताच्या पाचही बोटांवर विविध ग्रहांचा प्रभाव असतो त्यामुळे प्रत्येक बोटावर एक ठरावीक धातूची अंगठी घालण्याचा सल्ला दिला जातो. ज्याचा सकारात्मक प्रभाव आपल्या जीवनावर पडतो.

Spiritual Benefits Of Wearing Jewellery

- Advertisement -

तर्जनी

शास्त्रानुसार, तर्जनीमध्ये नेहमी सोन्याची अंगठी परिधान करावी. कारण, तर्जनी बोटावर गुरु ग्रहाचा प्रभाव असतो. त्यामुळे या बोटामध्ये सोन्याची अंगठी परिधान करणं शुभ मानलं जातं. या बोटामध्ये सोन्याची अंगठी परिधान केल्याने सुख-समृद्धी प्राप्त होते.

मध्यमा

मध्यमा बोटामध्ये फक्त लोखंड या धातूची अंगठी परिधान करण्याचा सल्ला दिला जातो. या बोटावर शनी ग्रहाचा अधिक प्रभाव असतो. त्यामुळे या बोटामध्ये कधीही सोन्याची अंगठी परिधान करु नये. कारण यामुळे आयुष्यात नकारात्मकता वाढू शकते.

अनामिका

अनामिका म्हणजेच रिंग फिंगरमध्ये तांब्याची अंगठी घालण्याचा सल्ला दिला जातो. या बोटावर सूर्य ग्रहाचा प्रभाव असतो.

- Advertisement -

कनिष्ठा

कनिष्ठा म्हणजे करंगळीमध्ये चांदीची अंगठी घालण्याचा सल्ला दिला जातो. या बोटावर बुध ग्रहाचा प्रभाव असतो. या बोटामध्ये चांदीची अंगठी घातल्याने वैवाहिक जीवन सुखमय राहते.

अंगठा

ज्योतिष शास्त्रानुसार, अंगठ्यामध्ये चांदी किंवा प्लॅटिनमची अंगठी घालणं शुभ मानलं जातं. अंगठ्यावर शुक्र ग्रहाचा अधिक प्रभाव असतो. या बोटात अंगठी घातल्याने व्यक्ती तणानापासून दूर राहतो.


हेही वाचा :

हिंदू धर्मात नववधुला अंगठीने का लावले जाते कुंकू ?

- Advertisment -

Manini