शुभ कार्याच्या सुरुवातीला नारळ का फोडला जातो? जाणून घ्या कारण

शुभ कार्याच्या सुरुवातीला नारळ का फोडला जातो? जाणून घ्या कारण

हिंदू धर्मांमध्ये जवळपास सर्वंच देवी-देवतांना नारळ अर्पण केला जातो. कोणत्याही पूजेमध्ये आणि शुभ कार्याच्या सुरुवातीला नारळाची आवश्यकता असते. पौराणिक मान्यतेनुसार, नारळाला सर्वात पवित्र फळ मिळालं आहे. कारण, यामध्ये ब्रह्मा, विष्णू, महेश या तीन देवतांचा वास असल्याचं म्हटलं जातं. नारळाला अनेकजण ‘श्रीफळ’ म्हणून देखील ओळखतात. असं म्हणतात की, देवाला नारळ वाहिल्याने भक्तांची सगळी दुःख दूर होतात.

शुभ कार्याच्या वेळी नारळ का फोडला जातो?

नारळ फक्त देवालाच वाहिला जात नाही तर शुभ कामाच्या सुरुवातीला देखील याचा वापर केला जातो. पूजेमध्ये नारळ फोडणे म्हणजे तो देवाच्या चरणांमध्ये समर्पित केला आहे असं समजलं जातं. खरंतर, पुरातन काळामध्ये दिल्या जाणाऱ्या बळी प्रथेला तोडण्यासाठी त्या जागी नारळ फोडण्याची प्रथा सुरु झाली होती.

नारळाचं झाडं मानले जाते शुभ

घराच्या परिसरात लावलेले नारळाचे झाड अनेक प्रकारचे वास्तू दोष दूर करते. असं म्हणतात की, नारळाच्या झाडाची पूजा केल्याने भगवान विष्णूंचा आर्शिवाद प्राप्त होतो.हिंदू धर्मामध्ये अशी मान्यता आहे की, जेव्हा भगवान विष्णूंनी पृथ्वीवर अवतार घेतला तेव्हा ते आपल्या सोबत लक्ष्मी, नारळाचे झाड आणि कामधेनु घेऊन आले होते. ज्योतिष शास्त्रानुसार, ज्या घरामध्ये नारळाचे झाड असते. तिथे नेहमी धन-समृद्धी टिकून राहते.


हेही वाचा :

First Published on: November 29, 2023 7:20 PM
Exit mobile version