आई-वडीलांच्या मृत्यूनंतर मुलांचे मुंडन का केले जाते?

आई-वडीलांच्या मृत्यूनंतर मुलांचे मुंडन का केले जाते?

हिंदू धर्मात अंतिम संस्कारासंबंधित अनेक नियम सांगितले जातात. यांपैकी काही नियम मृत व्यक्तीसाठी असतात तर काही नियम मृत व्यक्तीच्या कुटुंबियांसाठी असतात. मुंडन हा देखील अंतिम संस्कारातील एक महत्त्वाचा भाग आहे. शास्त्रात आई-वडीलांचा मृत्यू झाल्यावर मुलांचे मुंडन केले जाते. ही परंपरा प्राचीन काळापासून सुरु आहे. परंतु यामागे 3 रोचक तथ्य सांगण्यात आले आहेत.

आई-वडीलांच्या मृत्यूनंतर मुलांचे मुंडन का केले जाते?

मृत व्यक्तीने त्याच्या जिवीत काळात आपल्या कुटुंबियांसाठी अनेक त्याग, कार्य, कष्ट केलेले असतात. त्यामुळेच मुंडन करुन त्यांचे कुटुंबातील काही सदस्य त्यांचे आभार व्यक्त करतात. याचं कृतज्ञतेसाठी मुंडन करण्याची परंपरा अनेक काळापासून सुरु आहे.

मृत्यूनंतर मृत व्यक्तीच्या शरीराजवळ अनेक हानिकारक जीवाणू निर्माण होऊ लागतात. यावेळी घरातील सदस्य अंतिम संस्कार होईपर्यंत मृत व्यक्तीच्या शरीराला अनेकदा स्पर्श करतात. अशावेळी मृत व्यक्तीच्या आसपास निर्माण झालेले जीवाणु अनेकांच्या संपर्कात येतात. त्यामुळेच अंतिम संस्कार करुन परतल्यानंतर अंघोळ करणे, नख कापणे तसेच केस कापले जातात.

शास्त्रानुसार, मृत्यूनंतर जेव्हा आत्मा शरीरापासून दूर होतो त्यावेळी तो काही दिवसांनी यमलोकी जातो. अशात तो आत्मा मृत्यूनंतर काही दिवस आपल्या कुटुंबियांच्या संपर्कात येतो. धर्म ग्रंथानुसार, केसांवर नकारात्मक ऊर्जा लवकर हावी होते. त्यामुळे नकारात्मक ऊर्जा दूर राहण्यासाठी मृत व्यक्तीच्या जवळचे व्यक्ती मुंडन करतात.

 


हेही वाचा :

तुळशीच्या कुंडीवर काढा ‘ही’ शुभ चिन्हं; होतील सकारात्मक बदल

First Published on: January 24, 2023 6:50 PM
Exit mobile version