Live Update: नागपुरात २४ तासांत ५,८५२ नव्या कोरोनाबाधितांची वाढ, ८९ जणांचा मृत्यू

Live Update: नागपुरात २४ तासांत ५,८५२ नव्या कोरोनाबाधितांची वाढ, ८९ जणांचा मृत्यू

Live update Mumbai Maharashtra

मागील २४ तासांत नागपुरात ५ हजार ८५२ नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले असून ८९ जणांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. तर ५ हजार ९२१ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. नागपुरमधील कोरोनाबाधितांची संख्या ३ लाख ७९ हजार ९८०वर पोहोचली आहे. यापैकी आतापर्यंत ७ हजार २५ जणांचा मृत्यू झाला असून २ लाख ९५ हजार ६१७ जण कोरोनामुक्त झाले आहेत. तर सध्या ७७ हजार ३३८ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
गोव्यात गेल्या २४ तासांत २ हजार ३२१ रुग्णांची नोंद झाली असून ३८ जण मृत्यूमुखी पडले आहेत. तर ७१२ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. सध्या गोव्यात १५ हजार २६० रुग्णांवर उपचार सुरू आहेत. आतापर्यंत ६३ हजार ४८३ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. तर १ हजार ५५ जणांचा मृत्यू झाला आहे.
१ लाखापेक्षा अधिक सक्रिय रुग्ण ८ राज्यांमध्ये आहेत. यामध्ये महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, कर्नाटक, केरळ, राज्यस्थान, छत्तीसगढ, गुजरात आणि तामिळनाडूचा समावेश आहे, अशी माहिती आरोग्य मंत्रालयाकडून देण्यात आली.
देशात आतापर्यंत १४.१९ कोटी कोरोना लसीकरण पार पडेल, अशी माहिती आरोग्य मंत्रालयाकडून देण्यात आली आहे.
गुजरातमधून निघालेली ऑक्सिजन एक्सप्रेस कंळबोळी स्थानकात दाखल झाली आहे. एक्सप्रेसमध्ये ऑक्सिजनचे तीन टँकर आहेत. ज्यात १४ टन ऑक्सिजनचा साठा आहे.(सविस्तर वाचा )
ठाण्यातील वर्तक नगर येथे असणाऱ्या वेदांत रुग्णालयात ऑक्सिजन अभावी ६ जणांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना आहे. (सविस्तर वृत्त थोड्याच वेळात )
देशातील कोरोना परिस्थिती गंभीर होत आहे. गेल्या २४ तासात देशात ३ लाख ५२ हजार ९९१ नव्या रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. तर २ हजार ८१२ जणांचा देशात कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. राज्यात सध्या २८ लाख १३ हजार ६५८ अँक्टिव्ह रुग्ण आहेत.
भारतात कोव्हिशिल्ड लस प्रभावी ठरत असल्याचे समोर आले आहे. मात्र त्यासाठी लागणाऱ्या कच्च्या मालावर अमेरिकेने बंदी घातली होती. सीरम इंस्टिट्यूटने ही बंदी हटवण्यासाठी अनेकदा विनंती केली होती. मात्र अमेरिकेने त्यावर काहीच उत्तर दिले नाही. मात्र भारताचे एनएसए अजित डोभाल यांच्या एका फोनवर अमेरिका लसीसाठी लागणारा कच्चा माल देण्यासाठी तयार झाली आहे.( सविस्तर वाचा )
बृहन्मुंबई महानगरपालिकेला दीड लाख लसींचा साठा प्राप्त झाला आहे. त्यामुळे  पुढील तीन दिवस बहुतांशी केंद्रांवर होणार कोविड प्रतिबंध लसीकरण होईल असे सांगण्यात येत आहे. कोरोना प्रतिबंध लसीचे १ लाख ५८ हजार डोस बृहन्मुंबई महानगर पालिकेला प्राप्त झाले आहेत.  शासकीय आणि खासगी लसीकरण केंद्रांना त्याचे वितरण सुरू करण्यात आले आहे.
चित्रपटसृष्टीतील महत्त्वाचा समजला जाणारा ९३ वा ऑस्कर पुरस्कार सोहळ्याला सुरुवात झाली आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदा हा सोहळा व्हर्चुअल पद्धतीने पार पडणार आहे. अभिनेत्री प्रियांका चोप्रा आणि निक जोनस हे या पुरस्कार सोहळ्याचे निवेदन करणार आहेत. लॉस एन्जेलेसमध्ये हा सोहळा पार पडतोय.
First Published on: April 26, 2021 7:07 PM
Exit mobile version