दिल्लीत एअरफोर्स कर्मचाऱ्यांच्या पत्नी व मुलाची डम्बेल्सने हत्या,सख्खा भाचा अटकेत

दिल्लीत एअरफोर्स कर्मचाऱ्यांच्या पत्नी व मुलाची डम्बेल्सने हत्या,सख्खा भाचा अटकेत

दिल्लीत एअरफोर्स कर्मचाऱ्यांच्या पत्नी व मुलाची डम्बेल्सने हत्या,सख्खा भाचा अटकेत

देशात कोरोनाच कहर कमी होत असताना दुसरीकडे मात्र हत्याकांडाच्या धक्कादायक घटना रोज समोर येत आहेत. दिल्लीत एका एअरफोर्सच्या कर्मचाऱ्यांच्या पत्नी व मुलाची डम्बेल्स डोक्यात घालून निर्घृण हत्या करण्यात आलीय. हत्या केल्यानंतर आरोपी घरातील सीसीटिव्ही डीवीआर देखील घेऊन पळून गेला आहे. या घटनेनंतर एअरफोर्स कर्मचाऱ्याला मोठा धक्का बसला आहे. या प्रकरणी त्यांच्या सख्ख्या भाच्याला पोलिसांनी संशयित म्हणून ताब्यात घेतले असून पोलीस त्याची कसून चौकशी करत आहेत. (Air force employee’s wife and son killed by dumbbells in Delhi,nephew arrested)

श्री कृष्ण स्वरुप हे एअरफोर्समध्ये अकाउंटन्ट म्हणून काम करतात. संध्याकाळी सात वाजताच्या सुमारास श्री कृष्ण स्वरुप कामावरुन घरी परतले तेव्हा घरात जाताच त्यांची ५२ वर्षांची पत्नी बबीता आणि २७ वर्षांचा मुलगा गौरव यांचा खून झाला होता. दोघांच्या मृतदेहाच्या बाजूला रक्ताने माखलेला डम्बेल पडलेला आढळला. हा संपूर्ण प्रकार पाहून श्री कृष्ण यांनी त्वरित पोलिसांना फोन केला. रक्ताने माखलेला डम्बेल्स पाहून दोघांची डब्मेल्सच्या सहाय्याने हत्या करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले.

श्री कृष्ण स्वरुप यांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांची पत्नी काही दिवसांपूर्वी कोरोनाने ग्रस्त होती. कोरोनातून बरी झाल्यानंतर तिने एक्सरसाइज करण्यासाठी डम्बेल्स मागवले होते. मात्र ते डम्बेल्स माझ्या मुलाच्या आणि पत्नीच्या मृत्यूचे कारण ठरतील असे मला वाटले नव्हते असे ते म्हणाले.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, घरातील सर्व सामान अस्ताव्यस्त पडलेले होते. कपाटातील महत्त्वाचे सामान आणि सोने देखील गायब झाले होते. त्याचप्रमाणे घरातील सीसीटीव्ही डीवीआर देखील काढून टाकण्यात आला होता. याचाच अर्थ दोघांची हत्या करण्यात आली असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आलेय. पोलिसांनी या प्रकरणाची चौकशी केली असता त्यांचा भाचा अभिषेकचा या खुनामागे हात असल्याचे समोर आल्याने त्याला पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे.


हेही वाचा – माजी केंद्रीय मंत्री पी.आर. कुमारमंगलम यांच्या पत्नीची हत्या

 

 

First Published on: July 7, 2021 7:08 PM
Exit mobile version